esakal | महाराजांचे नाव ठेवण्यासाठी साताऱ्यातून एनओसी मागवायची का? : जितेंद्र आव्हाड
sakal

बोलून बातमी शोधा

Jitendra Awhad Criticize on Udaynraje Bhonsle Over Shivaji Maharaj Book

महाराजांचे नाव ठेवण्यासाठी साताऱ्यातून एनओसी मागवायची का? : जितेंद्र आव्हाड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

 मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आपण कुणाला म्हणत नाही? आपण सर्वांनाचा शिवाजी महाराजांप्रमाणे कार्य करण्यासाठी सांगत असतो. कुणाच्या घरात मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर काय एनओसी साताऱ्यातून मागवायची का? शिवरायांच्या प्रेमापोटीच हे नाव ठेवलं जातं, असे राज्याचे गृनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत भारतीय जनता पक्ष कार्यालयात 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. त्यानंतर मोठा वाद झाला आणि हे पुस्तक मागे घेण्यात आले. यावरुन शिवसेनेसह अनेक विरोधी पक्षांनी भाजपवर टीका केली होती.

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे जय भगवान गोयल आहेत कोण?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना आव्हान देत यावर बोलण्याचे आवाहन केले होते. त्यांनंत कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विटरवरून उत्तर दिले होते. तर, साताऱ्याचे उदयनराजे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन यावर प्रतिक्रीया दिली. उदयनराजे यांनी बोलताना शिवसेना राष्ट्रवादीसह सर्वच विरोधी पक्षांवर तोफ डागली. यांनंतर जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.

तत्पूर्वी, होय शरद पवार हे "जाणता राजा" आहेत. हाताच्या तळव्यावर महाराष्ट्राचा अभ्यास असणारा नेता म्हणजे शरद पवार. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रश्न, औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, स्त्रीयांचे प्रश्न, प्रश्नांची मालिका सांगा, सगळ्या प्रश्नांची उत्तरे शरद पवारांकडेच आहेत. म्हणून शऱद पवार हे जाणाता राजा असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.