
आव्हाडांनी पटोलेंना दिला न विसरण्याचा सल्ला; त्यात आपण पण... ‘ऑल द बेस्ट’
महाराष्ट्रातील राजकारणात सद्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टिका करण्याचे प्रमाण वाढले आहे. शरद पवारांबद्दल बोलल्याने बातमी होत असल्याने असे घडत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी टिका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या आरोपाला जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करीत उत्तर दिले आहे.
नाना पटोले यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत टोला लगावला होता. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला शत्रुत्व हवे असेल तर आघाडीतून करावे. आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे खुले आव्हान त्यांनी दिले होते.
हेही वाचा: मुलींना घालायला लावायचा बिकिनी अन् शारीरिक संबंधाची जबरदस्ती; नंतर...
राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या धोक्याची तक्रार काँग्रेस हायकमांडकडे करणार आहे. बेईमानी आमच्या रक्तात नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत युती करीत काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केल्याचे नाना पटोले (nana patole) म्हणाले होते. यानंतर महाविकास आघाडीने फेसबुक पोस्टवरून नाना पटोले यांना ‘प्रदेशाध्यक्ष आहे की तालुकाध्यक्ष? पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी रडगाणे सूर आहे’ अशा प्रकारची टीका केली होती. त्याच टीकेला प्रत्युत्तर म्हणून नाना पटोले यांनी फेसबुक पोस्टवरून टोला लगावला होता.
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नाना पोटोलेंना जागा दाखवून देण्याचा प्रयत्न ट्विटच्या माध्यमातून केला. ‘नाना पोटोले आपण भाजपमध्ये होतात हे विसरू नका... शरद पवारांवर टीका करून राजकीय स्थान पक्के करून घेणारे खूप आहेत. त्यात आपण पण... ‘ऑल द बेस्ट’ असे ट्विट केले. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद वाढणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
जयंत पाटलांनी दिला होता नरमाईने घेण्याचा सल्ला
स्थानिक पातळीवर काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकते. लगेच टोकाची भूमिका घेणे योग्य नाही. भाजपच्या विरोधात तिन्ही पक्ष एकत्र आलेच पाहिजे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस का एकत्रित जाऊ शकले नाहीत? याची सध्या आम्ही माहिती घेत आहोत. तेव्हा नरमाईने घ्या, अस सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिला होता.
Web Title: Jitendra Awhad Nana Patole Tweet War Maharashtra
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..