महामार्गांवर ठेवा १०० पेक्षा कमी वेग! अतिवेगाने केला ४१ हजार व्यक्तींचा घात

सव्वातीन वर्षांत रस्ते अपघातात तब्बल ४१ हजार १७४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात प्रवासी, वाहक व चालकांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्गांची कनेक्टिव्हीटी वाढल्याने वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे.
द्रुतगती महामार्ग.
द्रुतगती महामार्ग.esakal

सोलापूर : मागील सव्वातीन वर्षांत रस्ते अपघातात तब्बल ४१ हजार १७४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात प्रवासी, वाहक व चालकांचा समावेश आहे. राष्ट्रीय महामार्गांची कनेक्टिव्हीटी वाढल्याने वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. अतिवेगाने त्यांचा घात केला आहे. पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, सातारा, जळगाव, नागपूर, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद या जिल्ह्यांसह मुंबइ शहरात सर्वाधिक साडेनऊ हजारांहून अधिक अपघाती मृत्यू झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. चिंतेची बाब म्हणजे अपघात आणि अपघाती मृत्यू दरवर्षी दोन ते साडेतीन हजारांची वाढ होत आहे.

द्रुतगती महामार्ग.
साताऱ्यातील सभेत पवारसाहेब भिजले, पण शेतकरी विरघळला : राजू शेट्टी

राज्यातील रस्त्यांवर वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून आता प्रत्येक व्यक्तीकडे एक वाहन, असे समिकरण पहायला मिळत आहे. कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचण्यासाठी वाहने भरधाव वेगाने चालविली जात आहेत. अतिवेगाने वाहन चालविणे, विरुध्द दिशेने वाहन चालविणे, विनाहेल्मेट दुचाकी तथा सिटबेल्ट न लावता चारचाकी चालवणे, मोबाइलवर बोलत वाहन चालविणे, या प्रमुख कारणांमुळेच रस्ते अपघात वाढल्याचे निरीक्षण महामार्ग पेालिसांनी नोंदविले आहे. तरीही, रस्त्यांवरील खड्डे, विनापरवाना उभारलेला गतिरोधक, महामार्गांवर वीजेची सोय नाही, अपघातप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी ठोस उपाययोजना नसणे, वाहतूक स्थानिक पोलिस, महामार्ग पोलिस, प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून केवळ दंड वसुलीला प्राधान्य, ही कारणेदेखील अपघात वाढीला कारणीभूत ठरली आहेत. जिल्हा स्तरावरील रस्ता सुरक्षा समितीचे नुसतेच कागदावर काम सुरु आहे. पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अपघाती मृत्यू झाले असून मुंबइ शहरातही दरवर्षी ४०० हून अधिक जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

द्रुतगती महामार्ग.
ED कारवाईनंतर राऊतांना उद्धव ठाकरे अन् शरद पवारांचा फोन

तीन वर्षतील रस्ते अपघात-मृत्यू
सन २०१९ २०२० २०२१ मार्च २०२२
अपघात ३२,९२५ २४,९७१ २९,४९४ ५,९९८
मृत्यू १२,७८८ ११,५६९ १३,५२८ ३,२८९
जखमी २८,६२८ १९,९१४ २३,०८० ४,३१६

द्रुतगती महामार्ग.
मंत्र्यांवर नाराज आमदारांनी घेतली सोनिया गांधींची भेट; केली 'ही' महत्वाची मागणी

महामार्गांवरील वेग मर्यादा निश्चित
राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्गांवर, घाट रस्त्यांवर वाहनांचा वेग किती असावा, याचे मापदंड २५ आक्टोबर २०१९ मध्ये निश्चित झाले आहे. त्यानुसार मुंबइ-पुणे महामार्गावर चारचाकी वाहनाचा वेग ताशी १०० तर इतर वाहनांसाठी ८० किलोमीटर निश्चित झाले. चारपदरी महामार्गांवर वाहनांचा वेग विशेषत: आठ प्रवासी असलेल्या वाहनांसाठी ९० चा तर मालवाहतूक वाहनांचा वेग ताशी ८० पेक्षा कमी असावा. दुचाकीसाठी ताशी ७० ची मर्यादा ठरली आहे. तीनचाकी वाहनांचा वेग चारपदरी महामार्गावर ताशी ६० असावा. घाटाचा रस्ता तथा वळणाचा रस्ता असल्यास वेगाची मर्यादा निम्म्याने कमी असावा, अशी नियमावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com