केतकीच्या अडचणीत वाढ, ठाणे कोर्टाकडून 5 दिवसांची पोलिस कोठडी

मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ketaki Chitale
Ketaki ChitaleSakal
Summary

मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार केतकीला अटक झाली असून केतकीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. केतकीला ठाणे सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातून केतकीला रबाळे पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिला आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी रबाळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी केतकी चितळेला पोलिसांनी अटक केली आहे.

Ketaki Chitale
'जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी आता कोणता नवीन भोंगा लावणार'

या पोस्टमुळे मागील काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडल्या आहेत. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांनीही एकमेकांवर आरोपप्रत्यारोप केले आहेत. अनेकांनी केतकीची पाठराखणही केली आहे. दरम्यान, केतकी चितळेविरोधात वर्ष 2020 मध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. केतकीने सोशल मीडियावर अनुसूचित जातींच्या व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्ट प्रकरणी अॅड. स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

दरम्यान, शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात केतकीच्या अडचणीत वाढ होत आहे. तिने मोबाईलमधील SMS डिलीट केले असल्याची माहिती समोर आली आहे. पवारांसंबंधित फेसबुक पोस्ट केतकीला कुणीतरी पाठवली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. केतकी व्हॉट्सअॅपचा वापर करत नसून फक्त फेसबुक आणि SMS च्या माध्यमातून सक्रिय असल्याचं पोलिसात तपासात स्पष्ट झालं आहे.

Ketaki Chitale
कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी प्रकाश आंबेडकरांचे नावं? वंचितने स्पष्ट केली भूमिका

केतकी चितळेविरोधात कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, बीडमधील आंबेजोगई, मुंबईतील गोरेगाव, नाशिक, पवई, पुणे, आमरावती आणि पिंपरी चिंडवड येथे देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com