Irshalwadi Landslide : दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत; CM शिंदेंची मोठी घोषणा

रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी (Irshalwadi Landslide) गावावर बुधवारी (दि. १९) रात्री उशिरा दरड कोसळली.
Khalapur Irshalwadi Landslide
Khalapur Irshalwadi Landslideesakal
Updated on
Summary

या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Khalapur Irshalwadi Landslide : रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी (Irshalwadi Landslide) गावावर बुधवारी (दि. १९) रात्री उशिरा दरड कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ७५ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

Khalapur Irshalwadi Landslide
Hidkal Dam : हिडकल जलाशयात 1928 मध्ये उभारलेलं विठ्ठल-रखुमाई मंदिर अखेर पाण्याखाली; धरणात दर्शनासाठी होत होती गर्दी

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही सांगितले.

प्राथमिक माहितीनुसार, एकूण 48 कुटुंब इथं आहेत. सुमारे 75 जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. जखमींवर तातडीनं उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातील 15 ते 17 घरं मलब्याखाली दबली गेली आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ व स्थानिक बचाव दल घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत.

Khalapur Irshalwadi Landslide
Kolhapur : आईचा टाहो, थिजलेला बाप अन् हादरलेलं शहर; आईसमोरच बसखाली सापडून पोटचा गोळा ठार

पण, या भागात जेसीबी पोकलन येऊ शकत नसल्याने त्यामुळे फक्त मानवी स्तरावर बचावकार्य सुरू आहे. हेलिकॉप्टर आम्ही तैनात ठेवले आहेत”, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. दरडग्रस्त यादीत हे गाव नव्हतं. दरडग्रस्त गावातील लोकांना आपण स्थलांतरीत करतो.

Khalapur Irshalwadi Landslide
Khalapur Irshalwadi Landslide: हेलिकॉप्टर तयार, पण.... ; CM एकनाथ शिंदेंनी सांगितली बचावकार्यातील आव्हानं

पण हे गाव नसल्याने आपण येथील लोकांना स्थलांतरीत केलेले नव्हते. हे गाव त्या यादीत का नव्हते, कुणाची चूक या सर्व गोष्टीची नंतर चौकशी होईलच. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत देऊ, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

World Otter Day Special: The Harsh Survival Battle of Otters in Raigad’s Polluted Rivers
image-fallback
Heartbreaking Tragedy in Ambenali Ghat Claims Lives of Five Childhood Friends
Raigad tourism development news
Marathi News Esakal
www.esakal.com