
Ladki Bahin eKYC Mandatory But Technical Issues Trouble Women
Esakal
लाडकी बहीण योजनेत अपात्र लाभार्थ्यांनीही लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर सरकारने पडताळणीची मोहिम राबवली. यात लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. दरम्यान, यानंतर आता राज्यात सर्व लाडक्या बहिणींना ई केवायसी करणं बंधनकारक केलंय. यासाठी दोन महिन्यांची मुदतही दिली आहे. सरकारने अधिकृत शासन निर्णय जारी केला असून ई केवायसीच्या प्रकियेला सुरुवात झाली. मात्र आता सर्वर डाऊनमुळे लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्यात अडचणी येत असल्याचं समोर आलंय.