Ladki Bahin
sakal
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केलीय. ईकेवायसी प्रक्रियेतील त्रुटींमुळे अनेक महिलांचा लाभ मिळू शकला नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. आता लाडकी बहीण संदर्भातील तक्रारी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक राज्य सरकारने जारी केला असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलीय.