Aditi Tatkare's Ladki Bahin Remark Sparks Debate
esakal
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा हफ्ता खात्यात कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागून राहिलं आहे. जुलै महिना संपून आता ऑगस्ट सुरू झाला. जुलैच्या हफ्त्याची संभाव्य तारीख आता समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हफ्ता १५ ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.