स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर?

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या हा पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
Employment to the unemployed due to nashik municipal elections
Employment to the unemployed due to nashik municipal elections esakal
Updated on

मुंबई : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्याची शक्यता आहे. यासाठी विशेष ओबीसी विधेयक (OBC Bill) आज विधानसभेत मांडण्यात येणार आहे. या विधेयकानुसार राज्य सरकार निवडणुकीसंदर्भातील काही अधिकार हे स्वतःकडे घेणार आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर हे विधेयक आणलं जाणार असल्याची चर्चा आहे. (Local body elections to be postponed for six months the bill will come in maha assembly)

Employment to the unemployed due to nashik municipal elections
मुंबईवर भगवा फडकेल अन् महापौर शिवसेनेचाच होईल - पेडणेकर

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकले जाण्याची शक्यता आहे. कारण प्रभाग किंवा वॉर्ड रचनेचे अधिकार स्वतःकडं घेण्याबाबतचे राज्य सरकार विधेयक मांडणार असल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशमद्ये निवडणुका पुढे ढकलण्याबाबत अशाच प्रकारचं विधेयक आणत सरकारनं निवडणूक आयोगाचे काही अधिकार स्वतःकडे घेतलेले होते. त्याच धर्तीवर हे विधेयक असेल. ते मंजुर झाल्यास सरकारला सहा महिन्यांचा अवधी घेता येणार आहे. यासंदर्भात आज बैठकही होणार आहे.

Employment to the unemployed due to nashik municipal elections
'बेस्ट'च! आजपासून मुंबईत २४ तास बससेवा

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर सरकारची धावाधाव सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बैठक पार पडली. यामध्ये मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकार विचार करत आहे. या विधेयकानुसार, निवडणुकीचे काही अधिकार राज्य सरकारनं आपल्याकडे घेतले आहेत. यामध्ये निवडणुकीची तारीख, प्रभाग रचना, सदस्य संख्या यांचा समावेश आहे. जर हे विधेयक मांडलं गेलं तर सहा महिन्यांसाठी निवडणुकीसाठी वेळ मागितला जाऊ शकतो. या सहा महिन्यांत ओबीसी राजकीय आरक्षणाचा इम्पिरिकल डेटा मिळवायला वेळ मिळेल. या सहा महिन्यांच्या कालावधीत प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com