esakal | कोरोनामुक्ती मुंबई-पुण्यासाठी लांबचा पल्ला; राज्यातील ५ जिल्हे कोरोनामुक्त, आणखी १ जिल्हा उंबरठ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

In Maharashtra 5 districts are corona free and 1 more is likely but Mumbai Pune is doubtful

- राज्यात कोरोना विषाणूंचा फैलाव वेगानेIn Maharashtra 5 districts are corona free and 1more is likely but Mumbai Pune is doubtful होत आहे. राज्यातील 31 जिल्ह्यांमधील पाच हजार 218 रुग्णांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. या संसर्गाचे प्रमाण वाढत असले तरीही त्यात मृत्यू होणाऱयांपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱया रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.
- राज्यात 9 मार्च ते 22 एप्रिलपर्यंत 722 रुग्ण (14 टक्के) कोरोनामुक्त झाले आहेत. त्या तुलनेत मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण पाच टक्के (251 रुग्णांचे मृत्यू) असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

कोरोनामुक्ती मुंबई-पुण्यासाठी लांबचा पल्ला; राज्यातील ५ जिल्हे कोरोनामुक्त, आणखी १ जिल्हा उंबरठ्यावर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यातील पाच जिल्हा कोरोनामुक्त झाले असून, आणखी एक जिल्हा त्याच्या उंबरठ्यावर आहे. मात्र, मुंबई-पुण्यासह ठाणे, पालघर, नाशिक आणि नागपूर ही शहरे कोरोनामक्तीचे उद्देशापासून अद्यापही लांब आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात कोरोना विषाणूंचा फैलाव वेगाने होत आहे. राज्यातील 31 जिल्ह्यांमधील पाच हजार 218 रुग्णांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. या संसर्गाचे प्रमाण वाढत असले तरीही त्यात मृत्यू होणाऱयांपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱया रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. राज्यात 9 मार्च ते 22 एप्रिलपर्यंत 722 रुग्ण (14 टक्के) कोरोनामुक्त झाले आहेत. त्या तुलनेत मृत्यू झालेल्या रुग्णांचे प्रमाण पाच टक्के (251 रुग्णांचे मृत्यू) असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

'हे' जिल्हे झाले कोरोनामुक्त
मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, हिंगोली विदर्भातील गोंदीया आणि कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यांमध्ये आता कोरोनाचा एकही रुग्ण नव्याने आढळला नाही. त्यामुळे हे जिल्हे आता कोरोनामुक्त झाले आहेत. तर, सांगली जिल्ह्यात कोरोनाचे निदान झालेल्या 27 पैकी 26 रुग्णांना 14 दिवस विलगिकरण कक्षात ठेऊन त्यांच्यावर प्रभावी उपचार करण्यात आले. त्यानंतर ते कोरोनामुक्त होताच घरी सोडण्यात आले. आता फक्त एकाच रुग्णावर तेथे उपचार सुरू आहेत. 

Coronavirus : उरुळी कांचन : कोरोनाग्रस्त महिला इतरांच्या संपर्कात अन्...

कोरोनामुक्तीचा टप्पा लांब असलेले जिल्हे
राज्यात सर्वाधिक उद्रेक मुंबई आणि त्यापाठोपाठ पुण्यात झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील कोरोनचा रुग्णांच्या संख्येने तीन अकड्यांचा टप्पा ओलांडला आहे. नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांमध्येही रुग्णसंख्या शंभरीच्या जवळ पोचत असल्याने तेथील रुग्ण बरे होऊन घरी 2 ते 15 टक्क्यांच्या दरम्यान असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आलील. 

केवळ दुध विक्री केंद्र दोन तासासाठी राहणार सुरू

मुंबई-पुण्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण

मुंबई-पुण्यात लाँकडाऊननंतर सोसायट्यांमधील कोरोनाचा फैलाव कमी झाला. मात्र, मुंबईतील धारावी आणि पुण्यातील भवानी पेठ, कासेवाडीचा परिसर, येरवडा या झोपडपट्ट्यांच्या भागात मोठ्या प्रमाणात रुग्णांचे निदान होत आहे. लोकसंख्येची घनता सर्वाधिक असल्याने रुग्ण बरे होऊन जात असतानाच नव्या रुग्णांची रोजच्या रोज भर पडत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये निदान झालेल्या रुग्णांच्या तुलनेत 13 टक्के (442) तर, पुण्यात 19 टक्के (137) रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ठाणे आणि पालघरमध्ये हे प्रमाण 7 टक्के आहे. 

पुण्यात फिरत्या दवाखान्यांमुळे सापडले कोरोनाचे 'एवढे' रुग्ण

कोण होतंय लवकर कोरोनामुक्त
-    लवकर निदान होणारे रुग्ण
-    20 वर्षांपर्यंतची 100 टक्के रुग्ण बरे होत आहेत
-    20 ते 50 वर्षे वयोगटातील 94 टक्के रुग्ण होतात कोरोनामुक्त
-    मधुमेह, उच्च रक्तदाब असे इतर आजार नसणारे रुग्ण
-    निर्व्यसनी रुग्ण होता लवकर बरे
-    पुरुषांच्या तुलनेत बरे होणाऱयांमध्ये स्त्रियांचे प्रमाण जास्त
-    63 टक्के स्त्रिया खडऱडीत बऱया होतात
-    पुरुषांमध्ये बरे होण्याचे प्रमाण 37 टक्के आहे.

Video : १ वर्षाचे बाळ एका महिन्यानंतर आईच्या कुशीत; 'अशी' झाली...

काय उपचार होतात
-    कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी निश्चित असे कोणतेही औषध नाही. रुग्णाच्या लक्षणांवर आधारीत उपचार केले जातात. 
-    ताप असलेल्या रुग्णांना तो कमी करण्याची औषधे दिली जातात. 
-    रुग्णाच्या अवयवांचे कार्य व्यवस्थित राहील याची काळजी घेतली जाते. 
-    कोरोना विषाणू श्वसनसंस्थेवर आक्रमण करतो. त्यामुळे रुग्ण अत्यवस्थ होऊन व्हेंटीलेटवर जाणार नाही, याची काळजी घेतली जाते.
-    सध्या निदान होणाऱया रुग्णांपैकी 85 टक्के रुग्णांमध्ये ठळक कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत. 
-    पण, त्यानंतरही त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. 
-    कोरोना झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा यात समावेश आहे. 
-    जेमतेम 13 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली. 
-    सध्या उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णांमध्ये दोन टक्के (59) रुग्ण अत्यवस्थ 
 

Video : १ वर्षाचे बाळ एका महिन्यानंतर आईच्या कुशीत; 'अशी' झाली...