मराठवाड्याचं राजकीय वजन वाढलं; 'या' आमदारांना मंत्रीपदाची लाॅटरी

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मराठवाड्याला अधिक महत्व देण्यात आलंय.
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet Expansionesakal
Summary

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मराठवाड्याला अधिक महत्व देण्यात आलंय.

Maharashtra Cabinet Expansion : महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर नव्यानं स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) अखेर झाला आहे. गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त दिवसांनी हा मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet News) विस्तार पार पडला.

विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना मंत्रिपद देण्यात आलं, कुणाला वगळण्यात आलं, कोणत्या जिल्ह्यांना विशेष महत्त्व दिलं गेलं, याही गोष्टींचा उलगडा या मंत्रिमंडळ विस्तारातून स्पष्ट झालाय. त्यातून अनेक राजकीय (Maharashtra Politics) अर्थही काढले जाणार, हेही नक्कीच. म्हणून, कोणत्या जिल्ह्याला मंत्रिमंडळात अधिक महत्व देण्यात आलंय हे आपण पाहू..

Maharashtra Cabinet Expansion
Bihar Political Crisis : नितीशकुमार सरकार कोसळलं; भाजपच्या 16 मंत्र्यांचा राजीनामा

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मराठवाड्याला अधिक महत्व देण्यात आलंय. मराठवाड्यातून तानाजी सावंत (Tanaji Sawant), संदिपान भूमरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीय. शिवाय, औरंगाबादचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी देखील मंत्रिपदाची शपथ आहे, त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्याचं राजकीय वजन वाढलंय का? हे या विस्तारावरुन स्पष्ट होतंय. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची मंत्रीमंडळात वर्णी लागलीय. शिक्षण क्षेत्रासह साखर कारखानदारी क्षेत्रातील तानाजी सावंत हे एक मोठं नाव आहे. त्यांनी आज दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतलीय. फडणवीस सरकारच्या काळात त्यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली होती. तानाजी सावंत हे सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा वाशी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.

Maharashtra Cabinet Expansion
PHOTO : शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कोणाला मिळालं मानाचं स्थान; पहा नेत्यांची कारकिर्द

संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) : औरंगाबादच्या पैठण विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले संदिपान भुमरे यांनी सुद्धा मंत्रीपदाची शपथ घेतलीय. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात असणारे भुमरे यांचा मतदारसंघ असलेल्या पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांची समाधी आहे. त्यामुळे भुमरे 'एकनाथ भक्त' असून, आपल्यावर नेहमीच नाथांचे आशीर्वाद असल्याचे भुमरे म्हणतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा विजयाचा झेंडा फडकवत पुढे कॅबिनेट मंत्री सुद्धा झाले. अशातच आता पुन्हा एका एकनाथानं त्यांच्या आयुष्यात एन्ट्री केलीय. कारण, उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. त्यातच आता 'एकनाथ सरकारमध्ये मंत्री सुद्धा झाले आहेत. आतापर्यंतच्या निवडणुकीत 2009 ची विधानसभा निवडणूक वगळता आजवर ते या मतदारसंघातून पाचवेळा निवडून आले आहेत.

Maharashtra Cabinet Expansion
देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर शिंदे मंत्रिमंडळात; जाणून घ्या लोढा यांचं राजकीय महत्व

अब्दुल सत्तार (Abdul Sattar) : अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. अब्दुल सत्तार अब्दुल नबी हे त्यांचं पूर्ण नाव आहे. 1 जानेवारी 1965 साली सत्तार यांचा जन्म औरंगाबादच्या सिल्लोड गावातल्या एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांनी सिल्लोडमधून बीएपर्यंतचे त्यांचे शिक्षण पूर्ण केलं. महाविद्यालयापासून राजकारणाची आवड असलेल्या सत्तार यांच्या राजकीय कारकिर्दीला 1984 पासून सुरूवात झाली. घरात कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना 1984 साली ग्रामपंचायतची निवडणुक लढवून ते जिंकून आले. 2001 साली अब्दुल सत्तार हे विधानपरिषदेवर निवडून गेले. 2004 साली अब्दुल सत्तार हे अतिशय कमी फरकानं विधानसभा निवडणूक हरले. 2009 साली ते पहिल्यांदा सिल्लोडमधून विधानसभा निवडणूक जिंकून आले. 2014 साली (विधानसभा निवडणूकांआधी) कॉंग्रेसच्या मंत्रीमंडळात ते काही महीने कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर विधीमंडळात विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडताना ते चर्चेत राहीले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. आज शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांनी पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतलीय. एकंदरीत, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मराठवाड्याचा दबदबा कायम राहणार नक्की!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com