
शेती ते निवडणुका; वाचा शिंदे सरकारने घेतलेले ९ महत्त्वाचे निर्णय
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) इंधनावरील कर कमी करण्याचा महत्त्वापूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महागाईने होरपळणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजच्या बैठकीत पेट्रोल (Petrol) 5 तर, डिझेल (Desiel) 3 रुपयांनी स्वस्त करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा बोझा पडणार आहे. नेमकं आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणकोणते निर्णय घेण्यात आले आहेत. याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. (Maharashtra Cabinet Meeting Decision)
हेही वाचा: आता सरपंच, नगराध्यक्षांची होणार थेट जनतेतून निवड!
पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय
राज्यात "स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान" राबविणार.
केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार
आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान / यथोचित गौरव करण्याची (दिनांक ३१ जुलै, २०२० रोजी बंद करण्यात आलेली ) योजना पुन्हा सुरु करणार
हेही वाचा: नोकरदार मातांसाठी मुंबई हायकोर्टाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; म्हणाले, ''करिअर अन् मूल''...
बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा.
अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६९ मधील कलम ४३ मध्ये सुधारणा.
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने
राज्यातील ग्रामपंचायत सरपंचाची थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.
18 ते 59 वर्ष नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या मोफत कोरोना बूस्टर डोसची केंद्राची योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार
Web Title: Maharashtra Cabinet Meeting Cm Eknath Shinde Devendra Fadnavis Key Decision Fuel Farmer Sarpanch Health
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..