esakal | Corona Update : राज्याला दिलासा; रुग्णसंख्येत घट
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

Corona Update : राज्याला दिलासा; रुग्णसंख्येत घट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात मृत्यूचा आकडा कमी झाला असून आज 44 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.  मृतांचा एकूण आकडा 1,39,514 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 33,006 इतकी आहे.

हेही वाचा: NCBनं मुक्त केलेल्यांमध्ये राष्ट्रवादीशी संबंधीत व्यक्तीही - फडणवीस

आज 2486 नवीन रुग्ण सापडले असून करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,75,578 झाली आहे.कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण कमी झाले आहेत. तर 2446 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 63,99,464 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.32 % एवढे झाले आहे.

नागपूर,औरंगाबाद मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 9,नाशिक 4,पुणे 21,कोल्हापूर 5,लातूर 4, लातूर 1 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,41,499 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,023 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचा: CBI प्रमुख सुबोध जयस्वाल यांना मुंबई पोलिसांचं समन्स

मुंबईत 523 नवे रुग्ण, 3 रुग्णांचा मृत्यू

आज दिवसभरात 523 नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,47,305 वर पोहोचली आहे. तर 498 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,23,606 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज 3 कोविड मृत्यूची नोंद झाली झाली. मृतांचा एकूण आकडा 16,152 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 1091 दिवस झाला.आज दिवसभरात 37,731 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,06,89,795 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 5038 सक्रिय रुग्ण आहेत.

loading image
go to top