Maharashtra Politics | अशोक चव्हाण, वडेट्टीवार अनुपस्थित राहताच फडणवीस म्हणाले, अदृष्य... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis on eknath shinde

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुपस्थित सदस्यांचे आभार मानत टोला लगावला आहे.

अशोक चव्हाण, वडेट्टीवार अनुपस्थित राहताच फडणवीस म्हणाले, अदृष्य...

विधानसभेचं अध्यक्षपद जिंकत शिंदे-भाजपा सरकारने मोठा विजय मिळवला आहे. शिंदे सरकार विश्वासदर्शक ठराव मांडला असून हा ठराव बहुमताने जिंकला आहे. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुपस्थित सदस्यांचे आभार मानत, टोला लगावला आहे. हा ठराव प्रचंड मतांनी पारित व्हावं म्हणून बाहेर राहून मदत केलेल्या अदृश्य हातांचे आभार असं म्हणत फडणवीस यांनी कॉंग्रसेचे अशोक चव्हाण, वट्टेडिवार यांना टोमणा मारला आहे. (maharashtra politics)

हेही वाचा: 'पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग आला की, पवार साहेब म्हणाले...'

यावेळी बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदेंचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, या सभागृहाने शिवसेना भाजप-युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो. मुख्यमंत्री शिंदे हे कट्टर शिवसैनिक आहेत. ते जनतेचे सेवेकरी आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे त्यांनी 80 च्या दशकात काम सुरू केले. 1984 मध्ये एकनाथ शिंदे शाखा प्रमुख म्हणून नेमणूक केली होती. याकाळात शिंदेंनी अनेक आंदोलन केली. अनेकदा ते जनतेसाठी कारागृहात गेलेत. वैयक्तिक आयुष्यात अडचणी येऊनही एकनाथ शिंदे खंबीर राहिले. गरिबीमुळे शिंदेंना शिक्षण सोडावं लागलं मात्र वयाच्या 56 वर्ष त्यांनी पदवी मिळवली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा हा निर्धार वाखणण्याजोगा आहे, असं म्हणत त्यांनी स्तुती केली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार हे अनैसर्गिक होतं. मी पुन्हा येईन माझ्या या वक्तव्याची टिंगल झाली. मात्र मी एकटा आलो आणि सगळ्यांना घेऊन गेलो असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. पुढे ते म्हणाले, विरोधात असतानाही मी कधी विचलित झालो नाही. मात्र माझी टिंगल करणाऱ्यांचा मी बदला घेणार आहे, टिंगल करणाऱ्यांना मी माफ करणं हाच माझा बदला आहे असेही ते म्हणाले आहे. सत्ता हे आमचे साध्य नाही तर साधन आहे, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा: तुम्हाला DIGITAL DETOXची गरज आहे का? स्वत:ला विचारा हे प्रश्न

Web Title: Maharashtra Floor Test Politics Bjp And Eknath Shinde Win This Disqualified

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..