

Maharashtra 712 Digital Certificate
ESakal
मुंबई : महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ज्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. डिजिटल स्वाक्षरी असलेल्या ७/१२ प्रमाणपत्रांना आता कायदेशीर मान्यता मिळाली आहे. महसूल विभागात डिजिटल क्रांती घडवून आणण्याच्या दिशेने हा निर्णय एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला. जो आता डिजिटल ७/१२ रेकॉर्डला कायदेशीर संरक्षण प्रदान करतो.