Ladki Bahin Yojana latest KYC update Maharashtra
esakal
Ladki Bahin Yojana KYC Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ केवायसी प्रक्रियेमुळे बंद झालेल्या महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आलीये. केवायसी पूर्ण न झाल्यामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या सुमारे ८१ लाख महिलांना पुन्हा दरमहा १,५०० रुपये देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याची माहिती किसान सभेच्या शिष्टमंडळाने दिली आहे. त्यामुळे या महिलांना पुन्हा योजनेचा लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.