

लाडकी बहीण योजनेतून ८१ लाख महिलांना वगळण्यात आले असले तरी त्यापैकी अपात्र ठरलेल्या महिलांकडून आतापर्यंत देण्यात आलेल्या लाभाचे पैसे वसूल केले जाणार नाहीत. अपात्र महिलांना एकवेळ माफी दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. मात्र त्याचवेळी ही योजना केवळ महिलांसाठी असतानाही योजनेचा लाभ घेणाऱ्या १४ हजार पुरुषांकडून मात्र लाभाची रक्कम वसूल केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.