Latest Marathi News Live Update
esakal
पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर आधारित महाराष्ट्रात २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा धडाका लावला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेसाठी 'हरित महाराष्ट्र प्राधिकरण' स्थापन करण्याचे निर्देश दिले असून, यामध्ये पहिल्यांदाच स्टार्टअप्स आणि खासगी रोपवाटिकांचा (नर्सरी) मोठा सहभाग असणार आहे.