Crime News: लातूर हादरलं! अनाथ मुलीला कोल्ड्रिंकमधून गुंगीचं औषध पाजलं अन्...

मैत्रिणींवर विश्वास ठेऊन पार्टी पडली महागात
sexually assaulted pune crime
sexually assaulted pune crime sakal

लातूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अनाथ अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पिडित मुलगी अनाथ असून ती बालगृहात शिक्षणासाठी राहते.

१८ जानेवारीला ती तिच्या मैत्रिणीसोबत पार्टी करण्यासाठी अंबाजोगाई रोडवरील एका ज्वारीच्या शेतात गेली होती. त्यानंतर त्यातील एका मैत्रिणीने पतिला फोन करून तिथे बोलून घेतले. तिच्या पतीसोबत एक रिक्षा चालक देखील आला.

sexually assaulted pune crime
Pune Crime: सोशल मीडियावरील 'कोयता गॅंग' पोलिसांच्या रडारवर; नऊ जण पोलिसांच्या ताब्यात

सर्वांनी तिथे बसून गप्पा मारल्या. त्यानंतर पीडित मुलीला शीत पेयातून गुंगीचे औषध दिले. ती हळूहळू बेशुध्द होवू लागली याचा फायदा घेत तिच्यावर रिक्षा चालकाने आत्याचार केला. या प्रकारानंतर रिक्षा चालकाने पीडितेला सायंकाळी सहा वाजण्याच्याचा दरम्यान बालगृहाच्या समोर सोडले.

sexually assaulted pune crime
मविआमध्ये सामील होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठ विधान; म्हणाले, लवकरच...

तिला पुर्णपणे शुध्द आल्यावर तिने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला पीडितेच्या सांगण्यावरून आरोपींविरोधात तक्रार दाखल करून मैत्रिणींसह पाच जणांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास लातूर एमआयडीसी पोलीस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com