शिवसेना आक्रमक; मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार

बुधवार, 7 जून 2017

मध्यावधी निवडणुकीचे संकेत
शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास राज्यात गुजरातसोबत डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका होण्याचे संकेत आहेत. त्या दृष्टीनेच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय 31 ऑक्टोबरपर्यंत लांबविण्याचा भाजपचा राजकीय डाव असल्याची चर्चा आहे.

मुंबई - शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने आज (बुधवार) होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीवर थेट बहिष्कार घातला. शिवसेनेच्या या पवित्र्यामुळे सरकारमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला असून, शिवसेना सत्तेत राहणार की बाहेर पडणार या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

राज्यात सुरु असलेल्या शेतकऱी संपामुळे मुख्यमंत्री आणि भाजपची कोंडी झाली होती. त्यातच 31 लाख शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर भाजपने याचे श्रेय घेण्यासाठी राज्यभरात अभिनंदनाचे होर्डींग्ज लावले. त्यातच मंत्रीमंडळाला विश्वासात न घेता मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतल्याचा संतात शिवसेनेचा आहे.

याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीच्या श्रेय वादावरून सेना व भाजपात कमालीचा संघर्ष सुरु झाला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीवरील बहिष्कार हे त्याचेच द्योतक असल्याचे मानले जाते. दरम्यान, आज होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर गैरहजर राहणारी शिवसेना नेमकी कोणती भूमिका घेईल याकडे लक्ष लागली आहे.

मध्यावधी निवडणुकीचे संकेत
शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास राज्यात गुजरातसोबत डिसेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका होण्याचे संकेत आहेत. त्या दृष्टीनेच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय 31 ऑक्टोबरपर्यंत लांबविण्याचा भाजपचा राजकीय डाव असल्याची चर्चा आहे. 31 ऑक्टोबरनंतर कोणत्याही क्षणी गुजरातच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्याच दरम्यान राज्यातील सरकार अल्पमतात आले, तर महाराष्ट्रातही मध्यावधीचे सावट निर्माण होऊ शकते, असे संकेत आहेत.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
हिज्बुलचा दहशतवादी दानिश अहमदचे आत्मसमर्पण​
शेतकऱ्यांकडून मंदसोरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मारहाण​
लातूर: मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून
अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
'सीएम'साहेब! जाळपोळ करणारे शिवसेनेवाले समजायचे का?​
नागालँड: चकमकीत जवान हुतात्मा, 3 दहशतवादी ठार​
लंडनवासीयांनी लुटला सांस्कृतिक कार्यक्रमांचा 'आस्वाद'​
बसोलीच्या कलावंतांनी साकारले अनोखे भित्तिचित्र​
कोहली फाउंडेशनच्या कार्यक्रमात मल्ल्या ‘बिन बुलाए मेहमान’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra news shiv sena criticize BJP on farmer loan waiver