Leopard
Sakal
राज्यातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर आणि हल्ल्यांवर राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. नागपूरमध्ये अधिवेशनावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, महायुती सरकार बिबट्यांनी खाण्याच्या शोधात जंगलाबाहेर येऊ नये यासाठी जंगलातच शेळ्या किंवा बकऱ्या सोडणार आहे. अद्याप यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं नसलं तरी पुण्यातील काही भागात बिबट्यांसाठी शेळ्या-बकऱ्या सोडल्या आहेत.