आता राजभवनातून सूत्रं हलणार; भगतसिंह कोश्यारी सक्रीय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भगतसिंह कोश्यारी

Maharashtra : आता राजभवनातून सूत्रं हलणार; भगतसिंह कोश्यारी सक्रीय

मुंबई : राज्यात सुरू असणाऱ्या नाटकीय घडामोडींमध्ये भगसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची लवकरच एन्ट्री होणार असल्याचं दिसतंय. कोरोना झाल्याने कोश्यारी यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या शिंदे यांनी माघार घेण्यास नकार दर्शवल्याचं कळतंय. त्यामुळे शिवसेना कोणाची हा पेच अद्याप कायम आहे. शिवसेनेने १६ आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव दिल्याने संपूर्ण मंत्रिमंडळालाच घटनात्मक पेचाला सामोरं जावं लागू शकतं. (Maharashtra Politics )

हेही वाचा: Video : मुंबई-सुरत-गुवाहटी राजकीय कोंडी कधी सुटणार? गडकरींचं खास उत्तर

ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि भाजपचे केंद्रीय नेते सक्रीय झाले आहेत, त्यानुसार महाराष्ट्रात लवकरच सत्तांतराची नांदी पाहायला मिळू शकते. कायदेशीर लढाया आणि घटनात्मक पेच मार्गी लावण्यासाठी लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ऑक्टिव्ह होणार असल्याचं समोर येत आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने कोश्यारी सक्रीय होणार आहेत.

हेही वाचा: मोठी बातमी! मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू, 'या' तारखेपर्यंत कडक बंदोबस्त

विधानपरिषदेच्या निकालानंतर 48 आमदारांसह एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्याने राज्यातील मविआ सरकारवर अस्थिरतेची टांगती तलावार निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आठवडाभरात दोनदा दिल्ली गाठत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका घेत चर्चा केली आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर, दुसरीकडे बंडखोर एकनाथ शिंदेंच्या गटाने त्यांच्या गटाचे नाव निश्चित केले असून, आता हा सर्व वाद कायद्याच्या आणि घटनेच्या पेचात अडकाल आहे. त्यात राज्यातील सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेच्या गटातील आमदरांनीदेखील बैठकांमागे बैठका घेण्याचं सत्र चालू केलं असून, शिंदेसेनेकडून संध्याकाळपर्यंत एखाद्या मोठ्या घोषणेची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Maharashtra Political Crises Eknath Shinde Time For Koshyari To Be Active Again

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..