माकडं जशी या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारतात तसं..; ओवैसींनी आमदारांना सुनावलं

Asaduddin Owaisi
Asaduddin Owaisiesakal
Summary

शिवसेनेच्या 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी केलीय.

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) भवितव्यावर सध्या टांगती तलवार आहे. शिवसेनेच्या 40 हून अधिक आमदारांनी बंडखोरी केलीय. दरम्यान, या राजकीय संकटामुळं राष्ट्रीय विरोधीपक्षांच्या आघाडीवर कोणते परिणाम होतील, असं आता प्रश्न उपस्थित होत आहेत.

पुढच्या सार्वत्रिक निवडणुकांना आता दोनचं वर्षं उरली आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीवर कोसळलेल्या या पक्षफुटीच्या संकटामुळं आधीच कमकुवत असलेला राष्ट्रीय विरोधी पक्ष अजूनच कमकुवत होईल, असं जाणकार सांगत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी देखील आपली प्रतिक्रिया देताना बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केलीय.

ओवैसी म्हणाले, सध्या आम्ही विकासावर लक्ष केंद्रित केलंय. शिवसेनेची (Shiv Sena) ही अंतर्गत बाब आहे, याप्रकरणी महाविकास आघाडीनं विचार करावा, असं त्यांनी म्हटलंय. ओवैसी पुढं म्हणाले, महाराष्ट्रात जे काही चाललंय, ते माकडांच्या खेळासारखं आहे. माकडं जशी एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारतात, त्याचप्रमाणं शिवसेनेचे बंडखोर आमदार इकडून तिकडे उड्या मारत आहेत, अशी जोरदार टीका त्यांनी बंडखोर आमदारांवर केलीय.

Asaduddin Owaisi
महाराष्ट्राच्या राजकारणात कर्नाटकची एन्ट्री; काँग्रेसचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा

'आना ही पडेगा, चौपाटी में'; झिरवाळांचा फोटो टाकत संजय राऊतांचं खोचक ट्वीट

शिवसेनेचे खासदार संजय राऊत सकाळी उठल्याबरोबर एखादं ट्वीट करत आपल्या विरोधकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीयेत. आज देखील संजय राऊत यांनी सकाळी सकाळी एक भन्नाट ट्वीट केलंय. 'कब तक छिपोगे गुवाहाटी में, आना ही पडेगा.. चौपाटी में.. असं म्हणत त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचा फोटो टाकत ट्वीट केलंय. नरहरी झिरवाळ यांचा कमरेवर हात ठेवलेला हा भन्नाट फोटो त्यांनी पोस्ट केलाय.

Asaduddin Owaisi
सख्ख्या आईला सोडलं तर फडणवीसांना काय साथ देणार; संजय राऊतांचा शिंदेंवर थेट हल्ला

'हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावानं मतं मागा'

स्वतःची लायकी नाही, कर्तृत्व नाही, ओळख नाही आणि दुसऱ्याचे आई-वडील चोरायचे. यात तुमचे कर्तृत्व काय? हिंमत असेल तर स्वतःच्या बापाच्या नावाने मते मागा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर आसुड उगारला. शिवसैनिक अग्निपथावर चालतो. शिवसेना म्हणजे निखारा आहे. त्यावर पाय दिला तर जळून जाल, असा खणखणीत इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com