Maharashtra Politics | राज्यपालांना आज डिस्चार्ज; सत्ताबदलाच्या हालचालींना वेग येणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray and bhagat singh koshyari
राज्यपालांना आज डिस्चार्ज; सत्ताबदलाच्या हालचालींना वेग येणार?

राज्यपालांना आज डिस्चार्ज; सत्ताबदलाच्या हालचालींना वेग येणार?

राज्यात एकनाथ शिंदेंनी मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे आमदार घेऊन ऐतिहासिक बंड पुकारलं. राज्यात सत्ताबदलाची चिन्हं दिसू लागली. मात्र या सगळ्या गोंधळादरम्यानच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली. यामुळे सत्तास्थापनेसाठी तसंच अनेक महत्त्वाच्या राजकीय हालचालींवर मर्यादा आली. (Governor Bhagatsingh koshyari discharged from hospital)

मात्र आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हं दिसत आहेत. दरम्यान, या सगळ्या गोंधळामध्ये भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दिल्लीवाऱ्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. शुक्रवारी रात्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याची माहिती हाती येत आहे.

तर महाराष्ट्रात शिवसेना बंडखोरांविरोधात आक्रमक झाली आहे. एकनाथ शिंदे तसंच बंडखोरांना गद्दार म्हणत त्यांची कार्यालये फोडण्यात आली आहेत. एकनाथ शिंदे, तानाजी सावंत, श्रीकांत शिंदे अशा अनेक बंडखोर नेत्यांचे पुतळे जाळणे, पोस्टरला काळे फासणे, असे प्रकार होत आहेत. तर शिवसेना आता बंडखोर आमदारांवर कारवाई करण्याच्या प्रयत्नात आहे. बंडखोर मंत्र्यांच्या मंत्रिपदावरही गदा आणण्याचे शिवसेनेचे प्रयत्न चालू असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत (SHivsena MP Sanjay Raut) यांनी सांगितलं.