esakal | कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

sakal_logo
By
सूरज यादव

राज्यात मॉन्सून सक्रीय असल्याने कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने गुरुवारी वर्तविली. राज्यात मॉन्सून दाखल झाला आहे. त्यामुळे राज्यातील कमाल तापमानाचा पारा सरासरीपर्यंत कमी झाला.

हेही वाचा: Corona Update : नव्या रुग्णांची संख्या पुन्हा १० हजाराच्या पुढे

मध्य महाराष्ट्र, कोकणात पाऊस पडत असल्याने हवेत गारवा वाढल्याने कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत सात ते आठ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. कोकण विभागात तापमानात मोठी घसरण झाली आहे. या भागात कमाल तापमान २६ ते २९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. मध्य महाराष्ट्रात तापमानात चांगलीच घट झाली असून, महाबळेश्वर येथे सर्वांत १८.७ अंश सेल्सिअसचे सर्वांत कमी तापमान नोंदले गेले. या भागात १८ ते ३३, मराठवाड्यात ३३ ते ३५ तर विदर्भात ३३ ते ३६ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान नोंदविले गेले.

हेही वाचा: उद्धव ठाकरे सरकारचे मॉडेल प्रशंसनीय !

पुण्यात ढगाळ वातावरण
पुणे शहर आणि परिसरात गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसाच्या तुरळक सरी पडल्याने हवेत गारठा पसरला होता. पुण्यात गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ३.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. १ जूनपासून ५३.९ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला.