esakal | दिवसभरात नव्या कोरोना रुग्णसंख्येत हजाराची भर; मृत्यू घटले
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus

राज्यात एकूण 216016 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.54% झाले आहे.

दिवसभरात नव्या कोरोना रुग्णसंख्येत हजाराची भर; मृत्यू घटले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बुधवारी (ता.2) दिवसभरात 15,169 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57,76,184 झाली आहे. तसेच दिवसभरात 29,270 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 54,60,589 इतकी आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते 94.54 % एवढे झाले आहे. बुधवारी राज्यात 285 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून येथे 31 मृत्यू नोंदवण्यात आले. तर कोल्हापूर 25, अहमदनगर 21 जणांचे मृत्यू झाले. मृत्यूचा दर 1.67 % इतका आहे. (Maharashtra reports 15,169 new cases in the last 24 hours)

बुधवारी नोंद झालेल्या 285 मृत्यूंपैकी 211 मृत्यू हे मागील 48 तासातील, तर 74 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. तर आठवड्यापूर्वी झालेल्या 268 मृत्यूंची नोंद कोविड पोर्टलवर बुधवारी करण्यात आली. मृतांचा एकूण आकडा 96,751 इतका आहे. राज्यात बुधवारपर्यंत एकूण 2,16,016 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तसेच आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3,55,14,594 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,76,184 (16.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात एकूण 216016 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.54% झाले आहे.

हेही वाचा: पदोन्नती आरक्षणावरुन सरकारमध्ये मतभेद?; काय सांगते भारतीय संविधान?, वाचा सविस्तर..

दरम्यान, पिंपरीत बुधवारी ३७२ रुग्ण (Patients) आढळले. एकूण रुग्णसंख्या दोन लाख ५१ हजार ५७ झाली आहे. तर २७६ जणांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या दोन लाख ४१ हजार ७८६ झाली आहे. सध्या पाच हजार १७१ सक्रिय रुग्ण आहेत. बुधवारी शहरातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत शहरातील चार हजार शंभर जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयांत दोन हजार ६८६ रुग्ण उपचार घेत आहेत. दोन हजार ४८५ रुग्ण होम आयसोलेट आहेत.

बुधवारपर्यंत पाच लाख ९२७ व्यक्तींना लस देण्यात आली आहे. शहरात सध्या १३५ मेजर आणि एक हजार २१८ मायक्रो कंटेन्मेंट झोन आहेत. कंटेन्मेंट झोनमधील दोन हजार १२७ घरांना आज स्वयंसेवकांनी भेट दिली. सहा हजार ५२३ जणांचे विलगीकरण करण्यात आले.

हेही वाचा: राज्यातील बारावीच्या परीक्षांबाबत आजही निर्णय नाही!

राज्यभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.