Lok Sabha 2019 : लोकसभेबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नाहीच..!

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

मुंबई : अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली असली आणि 'लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्रच घ्या' अशी सत्ताधारी भाजपच्या नेतृत्त्वाची कितीही इच्छा असली, तरीही महाराष्ट्रात मात्र हे शक्‍य होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सभागृहामध्ये यासंदर्भात सूचक विधान केले. 

लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच बहुतांश राज्यांमधील विधानसभा निवडणुकाही घेण्यासंदर्भात देशभरात चर्चा सुरू आहे. यात पुढील वर्षी कार्यकाळ संपणाऱ्या राज्यांमधील विधानसभा निवडणुका लोकसभेबरोबरच घेण्याचा एक प्रस्ताव सर्वसाधारण चर्चेत आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत ऑक्‍टोबर 2019 पर्यंत आहे, तर लोकसभेची मुदत मे 2019 पर्यंत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणुकही एप्रिल-मेदरम्यानच होण्याची चर्चाही अधून-मधून सुरू असते. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनीच या चर्चेवर पडदा टाकला. 

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विधेयकास विधानसभेत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर विधान परिषदेत धनगर आरक्षणावर चर्चा झाली. त्यादरम्यान 'लोकसभा निवडणुकीचे नोटिफिकेशन निघण्यापूर्वी सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्यावा', अशी मागणी विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. लोकसभा निवडणुकीचे नोटिफिकेशन निघण्यास अवधी आहे आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लोकसभेबरोबरच होण्याची शक्‍यता मला तरी दिसत नाही.''

मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर
मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण; कृती अहवाल सादर
मुख्यमंत्री फडणवीस शिवाजी महाराजांच्या चरणी

Web Title: Maharashtra Vidhan Sabha election will not be held with Lok Sabha 2019