महाराष्ट्रातील नेत्यांना 'हाहा'कारांची भिती

 Maharashtrian leaders have fear about 'haha' react emoji.jpg
Maharashtrian leaders have fear about 'haha' react emoji.jpg

मुंबई: सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा थैमान सुरु आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे शहरात कोरोनाचा सर्वात जास्त संसर्ग झाला आहे. सध्या महाराष्ट्रात सर्व पक्षांनी एकत्र येत काम करण्याची गरज असताना राजकीय नेत्यांकडून सुरु असलेल्या राजकारणाचा आता राज्यातील जनतेनेच खरपूस समाचार घेण्यास सुरवात केली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे म्हणून  व तसेच काळजी घेत राजकीय नेते व्यक्त होण्यासाठी पत्रकार परिषद न घेता जनतेच्या सर्वात जवळील सोशल मीडियाचा वापर करत जनतेशी संवाद साधत आहेत.  फेसबुकसारख्या सोशल मीडियावर व्यक्त होत असताना जनतेतून वेगवेगळ्या कमेंट्सच्या माध्यमातून आपले प्रश्न राजकीय नेत्यांपर्यंत पोहचविले जात आहेत. सध्या घडत असलेल्या अनेक राजकीय घटनांचा निषेध म्हणून जनतेने आता 'हाहा' हे नवीन हत्यार हातात घेतले आहे. राजकीय नेत्यांच्या फेसबुक पोस्ट, व्हिडीओ, लाईववर आता मोठ्या प्रमाणात 'हाहा' रिऍक्टचा वापर जनतेकडून निषेध म्हणून केला जात आहे. 

नेमके काय आहे हे 'हाहा' रिऍक्ट:
सध्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेक राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू, समाजसेवक, ज्येष्ठ मंडळी, विविध कलाकार जनतेशी संवाद साधण्यासाठी फेसबुकसारख्या जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. विविध पोस्ट, व्हिडीओ, छायाचित्र प्रसिद्ध करण्यासाठी फेसबुकचा सर्वात प्रभावी माध्यम म्हणून वापर केला जात आहे. यासोबतच जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधता यावा म्हणून फेसबुक लाईवचा सुद्धा वापर केला जात आहे. यामध्ये प्रेक्षक कमेंटच्या माध्यमातून प्रत्यक्ष संवाद साधू शकतात. फेसबुकला अतिशय मानवी भावना व्यक्त करण्याचे प्लॅटफॉर्म म्हणून सुद्धा ओळखले जाते.फेसबुकवर भावना व्यक्त करण्यासाठी सात वेगवेगळ्या ईमोजी रिऍक्ट दिल्या आहेत. जर कोणाला फेसबुकवरील एखादी गोष्ट आवडली किंवा तो त्याच्याशी सहमत असेल तर त्यासाठी लाईक चे ईमोजी रिऍक्ट देण्यात आले आहे. एखादी गोष्ट मनाला स्पर्श करून गेली किंवा खूप जास्त आवडली तर त्याकरिता लव ईमोजी रिऍक्ट करण्याचा पर्याय दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फेसबुककडून केयर ईमोजी रिऍक्ट सुद्धा वापरकर्त्यांना देण्यात आली आहे. एखादी दुःखद घटना असेल तर त्यासाठी वेगळी दुःख व्यक्त करण्याची ईमोजी सुद्धा आहे. एखादी चुकीची पोस्ट असेल ज्यामुळे भावना दुखावल्या जाऊ शकतात त्यासाठी अँग्री ईमोजी रिऍक्ट सुद्धा फेसबुककडून देण्यात आली आहे. एखाद्या गोष्टीवर तुम्हाला हसू येत असेल तर  त्यासाठी 'हाहा' ईमोजी रिऍक्ट फेसबुकने दिलेले आहे. सध्या महाराष्ट्रातील जनतेकडून राजकीय नेत्यांच्या पोस्टवर हाहा रिऍक्ट होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 

राजकीय नेत्यांच्या पोस्टला 'हाहा' रिऍक्ट होण्यासाठी कशी झाली सुरवात:
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता राजकीय नेत्यांनी फेसबुकला प्रभावी माध्यम म्हणून वापर करण्यास सुरवात केली. राज्यात कोरोनाचे संकट असताना राज्यातील सरकार अस्थिर असण्याच्या अनेक घटना गेल्या काही कालावधीत घडल्या आहेत.  राज्याच्या मुख्यमंत्रींना आमदार न होऊन देण्यासाठी अनेक राजकीय हालचाली केल्या जात असताना जनतेने विरोधी पक्षाला 'हाहा' रिऍक्ट मधून चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने प्रत्येक राजकीय हालचालीवर 'हाहा' रिऍक्ट मधून व्यक्त होण्यास सुरवात केली. विधानपरिषद निवडणुकीचे राजकारण, केंद्राने राज्याला मदत केली नाही त्यावरून तापलेले राजकारण, आत्मनिर्भर भारत, मजुरांची हाल अपेष्टा, राज्यातील उद्योग सुरु करण्यावरून झालेले राजकारण अश्या अनेक घटना ह्या 'हाहा' रिऍक्टमधून जनतेचा रोष राजकारण्यांना दाखवत आल्या आहेत. सध्या राज्यातील काही बड्या नेत्यांच्या पोस्टवर लाईकपेक्षा 'हाहा' रिऍक्टचे प्रमाण वाढले आहे. जनतेतून सोशल मीडियावर व्यक्त होत असलेला विरोध बघता अनेक राजकीय नेत्यांनी आता सोशल मीडियावर व्यक्त होणे आवरते घेतले असून काहींच्या सोशल मीडिया टीमने विरोध करणाऱ्या जनतेला ब्लॉक करण्यास सुरवात केली आहे. यामुळेच राज्याच्या जनतेतील या 'हाहा'कारांची चांगलीच धास्ती राजकीय नेत्यांनी घेली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सध्या जनता सगळेच समजते  हि म्हण खरी ठरली असून नेत्यांनी जनतेचा विरोध ओळखायला हवा अशी वेळ जनतेने फेसबुकच्या 'हाहा' रिऍक्ट मधून राजकीय नेत्यांना दाखवून दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com