शेतकरी कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा, लग्न करतात असं विधान केलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आता दिलगिरी व्यक्त केलीय. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी गेले असताना कर्जमाफीच्या पैशांचं काय करता? शेतीत गुंतवणूक करता का असे प्रश्न कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विचारले होते. यामुळे माणिकराव कोकाटे यांच्यावर टीकाही होत होती. आता त्यांनी आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. मी शेतकऱ्यांबाबत असं विधान केलं नाही असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं.