Manmad Jalgaon Railway Megablock : मनमाड-जळगावदरम्यान 14, 15 ला मेगाब्लॉक; काही रद्द, अनेकांच्या मार्गात बदल

Central Railway Megablock
Central Railway Megablockesakal

Manmad Jalgaon Railway Megablock : मनमाड-जळगाव रेल्वेमार्गावर तिसरी रेल्वे लाइन आणि दुहेरी मार्गाचे काम केले जाणार असल्याने या मार्गावर सोमवार (ता. १४) ते मंगळवार (ता. १५) असा दोन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

त्यामुळे या मार्गावरील काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या वळवण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. (Manmad Jalgaon mega block on 14 and 15 august maharashtra news)

डाउनच्या पुढीलप्रमाणे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत: देवळाली-भुसावळ एक्स्प्रेस, मुंबई साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन (ता. १४), मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, इगतपुरी-भुसावळ एक्स्प्रेस, मुंबई-जालना एक्स्प्रेस, पुणे-जबलपूर एक्स्प्रेस (ता. १४), दादर बलिया एक्स्प्रेस (ता. १२),

मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस, मुंबई-आदिलाबाद एक्स्प्रेस (ता. १३/१४), पुणे-नागपूर एक्स्प्रेस (ता. १४), रिवा एक्स्प्रेस (ता. १५), पुणे-नागपूर एक्स्प्रेस (ता. १५), नांदेड एक्स्प्रेस, सिकंदराबाद एक्स्प्रेस, कोल्हापूर गोंदिया ट्रेन, लोकमान्य टिळक टर्मिनल-नांदेड एक्स्प्रेस.

अपच्या रद्द करण्यात आलेल्या गाड्या अशा : भुसावळ-देवळाली एक्स्प्रेस (ता. १३/१४), वाबडे भारत ट्रेन (ता. १४), नांदेड-मुंबई एक्स्प्रेस (ता. १३/१४), भुसावळ-इगतपुरी (ता. १४), जालना-मुंबई एक्स्प्रेस, जबलपूर-पुणे एक्स्प्रेस (ता. १४), बलिया-दादर एक्स्प्रेस (ता. १३/१६), नागपूर- मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस (ता. १३/१४), आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस (ता. १३), पनवेल एक्स्प्रेस (ता. १४), नागपूर-पुणे एक्स्प्रेस (ता. १४), मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, सिकंदराबाद-मुंबई एक्स्प्रेस (ता. १३/१४), गोंदिया-कोल्हापूर ट्रेन (ता. १४/१६), नांदेड-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेस (ता. १४)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Central Railway Megablock
Independence Day : कोल्हापुरात अजित पवार तर सोलापुरात हसन मुश्रीफ फडकवणार 'तिरंगा'; शासनाकडून ध्वजवंदन यादी जाहीर

मुंबई एक्स्प्रेस (ता. १३/१४). वळवण्यात आलेल्या अपगाड्या : हजरत निजामुद्दिन म्हैसूर हजरत निजामुद्दीन ट्रेन नागपूर, बल्लारशाहमार्गे (ता. १४), हुबळी ट्रेन, कुर्डवाडीमार्गे (ता. १४), दानापूर-पुणे एक्स्प्रेस लोणावळामार्गे (ता. १३), दिल्ली-बंगळुरू एक्स्प्रेस बालरशाहमार्गे, अमृतसर-नांदेड ट्रेन (ता. १४), जासीडीह पुणे ट्रेन लोणावळामार्गे (ता. १३), जम्मू-पुणे ट्रेन लोणावळामार्गे (ता. १३), हजरत निजामुद्दिन वास्को ट्रेन (ता. १३), लोणावळामार्गे, हावडा-पुणे ट्रेन लोणावळामार्गे (ता. १३)

डाउनच्या वळवण्यात आलेल्या गाड्या : पुणे-हावडा गाडी जळगावमार्गे (ता. १४), पुणे-दानापूर गाडी जळगावमार्गे (ता. १३), बंगळुरू-नवी दिल्ली ट्रेन इटारसीमार्गे (ता. १३), नांदेड-अमृतसर गाडी खांडवामार्गे (ता. १४), यशवंतपूर-अहमदाबाद ट्रेन, वसई रोडमार्गे (ता. १३), पुणे जम्मू ट्रेन मार्गे (ता. १३), वास्को हजरत निजामुद्दिन गाडी उधनामार्गे (ता. १४), पुणे हावडा ट्रेन उधना जळगावमार्गे (ता. १३), लोकमान्य टिळक टर्मिनस विशाखापट्टणम गाडी उधनामार्गे जळगाव (ता. १५), दादर साईनगर शिर्डी ट्रेन पुणे, दौंडमार्गे (ता. १४)

Central Railway Megablock
Mumbai Local Train Update : सीएसएमटी कडे जाणाऱ्या फास्ट लोकल धावतायेत उशिराने ! हे आहे कारण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com