राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता; कोकण-पश्चिम महाराष्ट्राला 'रेड अलर्ट' I Rain Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Rain Update

मुंबईसह कोकणकिनारपट्टीला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय.

राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता; कोकण-पश्चिम महाराष्ट्राला 'रेड अलर्ट'

Maharashtra Rain Update : मुंबई, पुणे, कोल्हापूरसह कोकणकिनारपट्टीला गुरुवारी मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. घाटमाथा, तसंच परिसरातही संततधार पाऊस झालाय. पश्चिम महाराष्ट्रात पावसाची (West Maharashtra Rain) रिपरिप होती. विदर्भात नागपूर वगळता अन्यत्र जोरदार पाऊस झाला नाही. मराठवाड्यातही पावसाचा जोर नव्हता. मात्र, पुढील तीन दिवस मुंबई कोकणासह मध्य महाराष्ट्राला रेड अलर्ट (Maharashtra Red Alert) कायम असणार आहे.

हेही वाचा: मी संजय राऊतांसमोर कधीही लोटांगण घातलं नाही; संदीपान भुमरेंचा पलटवार

त्यामुळं राज्यात पुढचे तीन ते चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापुरात आज रेड अलर्ट आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (Indian Meteorological Department) वर्तवलाय. राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये कालपासून तीन दिवस रेड अलर्ट देण्यात आलाय. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बरसणार असल्यानं प्रशासन सतर्क झालंय.

हेही वाचा: PM मोदींनी 'अक्षय पात्र किचन'चं केलं उद्घाटन; एक लाख मुलांसाठी बनवता येणार अन्न

राज्यात पावसाची दमदार हजेरी

देशातील अनेक राज्यांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलीय. जम्मू आणि काश्मीरपासून मध्य भारत आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. ढगफुटी, भूस्खलन, अतिवृष्टी आणि महापुरानं दिवसभरात विविध राज्यांमध्ये सुमारे 20 जणांचा मृत्यू झालाय.

  • 9 जुलै : रेड अलर्ट

  • 10 जुलै : ऑरेंज अलर्ट - मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर

  • 8-11 जुलै : सोसाट्याचा वारा - कोकण आणि गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहेल.

Web Title: Mansoon Update Mumbai Pune Red Alert Of Rain Maintained In Konkan And Central Maharashtra

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..