मागण्या मान्य होईपर्यंत एल्गार थांबणार नाही : खासदार संभाजीराजे भोसले

maratha kranti morcga sanhaji raje.jpg
maratha kranti morcga sanhaji raje.jpg

तुळजापूर : मराठा समाजाचे आरक्षण टिकविण्यात राज्यसरकारचे प्रयत्न कमी पडले आहेत. सरकारमध्ये समन्वयच नाही. असा आरोप राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केला आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारकडून फार प्रयत्न होताना दिसत नाहीत. राज्यभरात सुरु असलेले मराठा समाजाचे आंदोलन हे भाजपा पुरस्कृत नाहीत, हे लक्षात ठेवा. मी राष्ट्रपती पुरस्कृत खासदार आहे. विशेष म्हणजे २००७ पासून मी मराठा समाजाच्या विविध आंदोलनात सहभागी आहे. त्यामुळे मी मराठा समाजाच्या मागण्या पुर्ण होत नाही. तो पर्यंत मागे हटणार नाही.

मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागे करण्यासाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. या आंदोलनाला संभाजीराजें सहभागी झाले होतेॉ. याप्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले की, आता थांबणे नाही. मराठा समाजाचा आवाज संपुर्ण महाराष्ट्रात घुमला पाहीजे. मराठा समाजाच्या मागण्या पुर्ण होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार आहे. योग्य समन्वयाचा अभाव असल्याने मराठा समाजाचे आरक्षणाला स्थगिती आली आहे. आजी माजी मुख्यमंत्र्यांनी एकत्र येवू आरक्षणाच्या तिढा सोडविण्याचे आवाहन खासदार संभाजीराजे भोसले यांनी केले. 

राज्यात सध्या एमपीएससी परीक्षांना काही मराठा संघटना तसंच काही परीक्षार्थ्यांकडून विरोध होत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्याशिवाय लोकसेवा आयोगाची परीक्षा घेऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे. तर दुसरीकडे दलित संघटनांसह इतरांनी परीक्षेसाठी आग्रह धरला आहे. परंतु लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला विरोध केवळ कोरोनामुळे करत असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं. कोरोना कमी झाल्यावर परीक्षा घ्यावी, असंही त्यांनी सांगितलं. मात्र आधीच्या नियुक्त्या का दिल्या नाहीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

अशी झाली पर्वाला सुरुवात

एक मराठा, लाख मराठा ! आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, तुमचं आमचं नात काय, जय जिजाऊ- जय शिवराय! अशा जयघोषाने संपूर्ण तुळजापूर नगरी निनादली.

मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या वतीने तुळजापूरात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे तिसऱ्या पर्वाला प्रारंभ करण्यात आला आहे. दुपारी बारा वाजता तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. राज्यभरातून मराठा समाजातील युवकाचा मोठा सहभाग आंदोलनात होता. 

ढोल ताशांच्या तालावर गगनभेदी घोषणा देत मोर्चात सर्व समाजबांधव सहभागी झाला आहे. महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चाचे तुळजापूरवासीयांनी स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी सॅनिटायजर्स टनेल बसविण्यात आले होते. तुळजाभवानी मंदिराच्या आवारात जागरण-गोंधळ घालण्यात आला होता. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com