छत्रपती संभाजीनगर : अन्न व औषध प्रशासनाने समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या एका वाहनाला अडवून प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधित तंबाखूविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. इंदोरहून पुण्याकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनाचा सावंगी ते माळीवाडा टोलनाक्यादरम्यान पाठलाग करून वाहन ताब्यात घेण्यात आले. वाहनातून सुमारे 42 लाख 50 हजार रुपयांचा प्रतिबंधित पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा, तसेच 18 लाख रुपयांचे वाहन जप्त करण्यात आले असून, एकूण 60 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.