Viral: सीतेची 'झाल्या तिन्ही सांजावर' लावणी! मराठवाडा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार

औरंगाबाद शहरातील मराठवाडा विद्यापीठातील एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Viral News
Viral News esakal
Updated on

औरंगाबाद शहरातील मराठवाडा विद्यापीठातील एक व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्या व्हिडिओ क्लिपनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामध्ये एक विद्यार्थीनी रामायणावर आधारित एका नाटकातील प्रसंग साकारत होती. मात्र तेवढ्यात तिनं लावणी सादर केल्यानं उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रियाही व्हायरल झाली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहगिती नुसार मराठवाडा विद्यापीठात युवा महोत्सव सुरु होता. यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. महोत्सवा दरम्यान विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. त्यात एक विद्यार्थीनीनं रामायणावर आधारित एका नाटकातील प्रसंग सादर करत होती. त्याचवेळी सुरु झालेल्या झाल्या तिन्ही सांजा....या लावणीवर तिनं नृत्यास सुरुवात केली. हे पाहिल्यानंतर उपस्थितांना मोठा धक्काच बसला. त्यांनी याबाबत आयोजकांकडे विचारणा केली होती. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.

Viral News
Viral: जगजित सिंग यांची बॉलीवूडनं कधीच किंमत ठेवली नाही, भाऊ करतार सिंग यांची खंत

या सगळ्या घटनेचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं विरोध केला आहे. त्यांनी याप्रकाराबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. भावना दुखावल्याचे त्यांनी म्हटले असून याप्रकरणाची महाविद्यालयीन प्रशासनानं चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी असे म्हटले आहे.

Viral News
Sajid Khan Viral Video: 'मेरा कॅरेक्टर ढिला था..', अफेअर्स विषयी साजिदचे अनेक दावे अन् खुलासे...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drugs
sangola, shelakewadi zp school
Deccan Police have registered a case after an unemployed youth was allegedly cheated of Rs 20 lakh on the promise of a government job in Pune.
Speaking at Sakal Bhakti Shakti Vyaspeeth, Dr More highlighted the contribution of saints in shaping Maharashtra's social and cultural legacy.
Marathi News Esakal
www.esakal.com