नवीन घरात राहण्यापूर्वीच 'ते' विसावले भारत मातेच्या कुशीत...

महेश जगताप 
Wednesday, 24 June 2020

हुतात्मा जवान सुनील काळे यांची बांधलेल्या नवीन घरात राहण्याची शेवटची इच्छा राहिली अपूर्ण.

पुणे : बार्शी तालुक्यातील पानगाव येथील शेतकरी असलेले काळे कुटुंब. तरुणपणीच वडिलांचे छत्र हरवले पण खचला नाही. घरी शेतीही बरी होती. पण लष्करातील सेवेची आवड असल्याने सुनील काळे लष्करात दाखल झाले. गड्याला शेतीचीही आवड असल्याने शेतात काय पिकवल आहे. पाऊस पाणी आहे का ? गावाकडची लोक बरी हायती का अशी फोन वर विचारपूस करत. आमचा सुनील लय माणुसकीचा. आपल्याला चांगल्या घरात राहता आलं नाही पण पोरांना राहता यावं व त्यांच्या शिक्षणासाठी बार्शी येथे नुकतंच घर बांधून पूर्ण केलं होतं. तो आला की आम्ही पूजा करून त्या घरी राहायला जाणार होतो. पण नियतीला मान्य नव्हत. काल सकाळी टीव्हीवर बातमी पहिली अतिरेक्यांच्या हल्ल्यात कमांडर चार्ज असलेले सुनील काळे शहीद आणि मन सुन्न झालं .सगळं होत्याच नव्हतं झालं. आमच्या गावचा योध्दा गेला म्हणत दुःखद आठवणी काळे यांचे भाऊ सुधीर काळे यांनी सकाळशी बोलताना जागवल्या.

तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  काल जम्मू काश्मीर येथे पुलवामा विभागात बंडजू या गावी काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाली असता सीआरपीएफच्या एका तुकडीने बंडजू परिसर पाहणी करून अतिरेकी दबा करून बसलेल्या ठिकाणी घेराव केला असता  अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय जवान यांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन अतिरेकी ठार मारण्यात आले. यावेळी झालेल्या चकमकीत जवान सुनील काळे हे हुतात्मा झाले. आजच त्यांच्यावर गावी मृतदेह आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि ते अनंतात विलीन झाले. 

निरोगी आयुष्यासाठी योगा आवश्यक; जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम

ते गावी तीन महिन्यापूर्वी येणार होते पण अचानक देश लॉकडाऊन झाल्याने त्यांचं येणं पुढं ढकललं आणि ही घटना घडली. हुतात्मा काळे यांनी अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घातले. पण आज मात्र लढाई संपून जात असताना दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. पण शेवटी अतिरेक्यांनी पाठीमागून घात केला व डोक्याला गोळी लागली. तुझं देशासाठी मोठं योगदान आहे हे आम्ही कधी विसरणार नाही .कायम तुला स्मारणात ठेऊ अशी भावना गावातील नागरिकांनी व्यक्त केल्या. सुनील काळे हे हुतात्मा झाल्याची बातमी बार्शी तालुक्यात पसरताच बार्शी शहरासह तालुक्यात शोककळा पसरली .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Martyr Sunil Kale's last wish to live in a new house remained unfulfilled.