

Maharashtra Pre Monsoon Rain Alert
ESakal
महाराष्ट्रातील हवामान बदलणार आहे. हवामानातील बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला एक अत्यंत महत्त्वाचा इशारा आणि आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १ जूनपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार वादळे आणि मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या पावसाचा थेट संबंध मुख्य मान्सूनशी नाही.