Maharashtra Weather: मुंबईत धुवाधार कोसळणार! हवामान विभागाकडून नवं अपडेट, अन्य जिल्ह्यांसाठी काय सांगितलं?

IMD Rain Alert: महाराष्ट्रात मान्सूनने हजेरी लावली असून हवामान विभागाकडून नवं अपडेट जारी करण्यात आलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे.
Maharashtra Weather

Maharashtra Weather

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने हजेरी लावली असून हळूहळू राज्यातील सर्व जिल्हे मान्सून व्याप्त आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. तसेच उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात प्रदेशात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com