MHADA Application 2023 : तुमचं घराचं स्वप्न होणार आता पुर्ण; म्हाडासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म रिलिज्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mhada home news

MHADA Application 2023 : तुमचं घराचं स्वप्न होणार आता पुर्ण; म्हाडासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म रिलिज्ड

MHADA Application 2023 : महाराष्ट्र हाउसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच म्हाडा (MHADA), ही महाराष्ट्र सरकार कडून गेली 7 वर्ष महाराष्ट्राच्या काही शहरांमध्ये राहणीमााचा दर्जा वाढवण्यासाठी आणि सर्व सामान्य लोकांना आपल हक्काचं घर मिळावं यासाठी प्रयत्नशील आहे.

हेही वाचा: NEET UG परीक्षेसाठी 'Application Form' लवकरच होणार जाहीर

दरवर्षी अनेक लोक या फॉर्मच्या यादीत आपल नाव टाकत असतात; आणि काही नशीबवान लोकांचे घरही त्यात मंजूर होते. याही वर्षी म्हाडाने पुणे, मुंबई, ठाणे, कोकण याठिकाणांसाठी लिस्ट जाहीर केली आहे.

हेही वाचा: MES Application 2021 : ड्राफ्ट्‌समन व सुपरवायझरच्या 572 पदांसाठी होणार भरती !

म्हाडा लॉटरी रजिस्ट्रेशन 2023

सध्याच्या धावत्या जगात अनेक लोक आपल्या नोकरीसाठी मुलांच्या उत्तम शिक्षणासाठी छोट्या गावातून मोठ्या शहरात स्थलांतरित होतात, अशा वेळेस शहरातल्या वाढलेल्या जमिनीच्या भावामुळे त्यांना घर घेणे शक्य होतेच असे नाही. आणि जरी घेयचे म्हटले तरी ते दूरवर कुठेतरी शहराच्या बाहेर घ्यावे लागते; याच्याच मदतीसाठी म्हाडा लॉटरी मदत करते.

हेही वाचा: MHADA Lottery 2022 : घर घेऊ पाहणाऱ्यांचा हिरमोड; दिवाळीत सोडत नाहीच!

म्हाडाने फॉर्म सोडल्याच सांगितलेलं आहे. तुम्ही म्हाडाच्या ऑफिसियल वेबसाईट वरून यासाठीचा फॉर्म भरू शकतात. याबाबतची अजून माहिती आणि अपडेट साठी म्हाडाच्या वेबसाईट वर लक्ष ठेवा.

हेही वाचा: पुणे MHADA लॉटरीची लवकरच सोडत, तब्बल ४,७४४ नागरीकांना मिळणार हक्काची घरे

यासाठी खूप सोप्या तीन स्टेप्स फॉलो करा.

१. सर्वात आधी www.mhadagov.in या वेबसाईट वर जा आणि युजर नेम क्रिएट करून लॉग इन करा.

२. ॲप्लिकेशन मध्ये जाऊन आवश्यक ती माहिती भरून घ्या.

३. आणि ऑनलाईन पेमेंट करा.

हेही वाचा: Mhada Exam Fraud: तीन आरोपींविरूद्ध 3500 पानांचे दोषारोपपत्र दाखल

कोण अप्लाय करू शकत?

ॲप्लिकेशन देणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वयापेक्षा जास्त असावे. तो महाराष्ट्राचा कायम निवासी असावा. तुम्ही या ॲप्लिकेशन साठी चार प्रकारात अप्लाय करू शकतात; EWS (Economically Weaker Section), LIG (Lower Income Group), MIG (Middle Income Group), HIG (Higher Income Group) यापैकी एका सेक्शन द्वारे अप्लाय करू शकतात.