Mira Road killing: "ती तर माझ्या मुली सारखी... !" मिरारोड हत्येतील आरोपी सानेला एचआयव्ही झाला होता?

पोलिस चौकशीत आरोपीने जे सांगितले ते आश्चर्यचकित करणारे आहे.
Mira Road killing
Mira Road killingSakal

Mira Road killing: मुंबईतील मीरा रोड येथील गीता नगर भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. यानंतर आरोपीने कुकरमध्ये शिजवून आणि मिक्सरमध्ये बारीक करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

मात्र पोलिस चौकशीत आरोपीने जे सांगितले ते आश्चर्यचकित करणारे आहे. आरोपीने पोलिसांना सांगितले की तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. त्याने कधीही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. कारण ती त्याच्या मुलीसारखी होती. एका पोलीस अधिकाऱ्याने 'द इंडियन एक्स्प्रेस'ला ही माहिती दिली.

साने यांनी पोलिसांच्या चौकशीत अनेक धक्कादायक दावे केले:

गुरुवारी अटक करण्यात आलेला आरोपी मनोज रमेश साने (56) याने दावा केला की 32 वर्षीय सरस्वती वैद्य यांनी 3 जून रोजी आत्महत्या केली होती, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

त्यानंतर त्याने आत्महत्येचाही विचार केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सरस्वती वैद्य मृत्यू प्रकरण उघडकीस आल्यानंतर बुधवारी घटनास्थळी भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान आरोपी सानेच्या दाव्याची पडताळणी केली जात आहे.

न्यायालयाने सानेला 16 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली :

पोलिसांनी एफआयआरमध्ये आयपीसीच्या कलम 302 (हत्या) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस डीसीपी जयंत बजबळे म्हणाले, “त्याला ठाण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.''

"प्राथमिक चौकशीदरम्यान, सानेने पोलिसांना सांगितले की, 2008 मध्ये त्याला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समजले," असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Mira Road killing
Crime News : विमानात फोनवर बोलताना 'बॉम्ब'चा उल्लेख भोवला! महिलेच्या तक्रारीनंतर एकाला अटक

तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खूप पूर्वी उपचारादरम्यान झालेल्या अपघातानंतर संक्रमित रक्ताच्या वापरामुळे त्याला हा आजार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

साने यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्याकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र आहे, परंतु चांगली नोकरी न मिळाल्याने तो 10 वर्षांपासून पीडीएस दुकानात काम करतो.

डीसीपी म्हणाले की, स्वयंपाकघरातून गोळा केलेले शरीराचे अवयव फॉरेन्सिक विश्लेषणासाठी सर जेजे रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

पोलीस वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेत आहेत:

पोलीस वैद्यकीय तज्ज्ञांची मदत घेत आहेत आणि शरीराचे कोणते अवयव गायब आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्याकडून इलेक्ट्रिक कटर जप्त करण्यात आला आहे. हा गुन्हा यापूर्वी घडल्याचा संशय पोलिसांना आहे, मात्र बुधवारी ही बाब उघडकीस आली.

दाम्पत्याच्या फ्लॅटमधून शेजाऱ्यांना दुर्गंधी आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून फ्लॅटचा दरवाजा तोडला. पोलिसांना महिलेच्या मृतदेहाचे तुकडे स्वयंपाकघरात पडलेले आढळले. हे पाहून पोलिसही अचंबित झाले.

फ्लॅटवर पोलिस हजर असल्याचे साने यांना माहीत नव्हते, सायंकाळी आरोपी फ्लॅटवर पोहोचला तेव्हा पोलिसांना पाहून तो चक्रावून गेला. यादरम्यान त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याला पकडले.

Mira Road killing
Shivrajyabhishek Sohala : हिंदवी स्वराज्याची स्थापना केवळ राजकीय सत्तेसाठी केली नव्हती, हा तर भारतीयत्वाचा अरुणोदय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com