MLA Disqualification Case: सुनील प्रभूंची उत्तरं समाधानकारक नव्हती; आमदार अपात्रतेप्रकरणी शिंदे गटाची प्रतिक्रिया

MLA Disqualification Case
MLA Disqualification Case

MLA Disqualification Case: आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी संपली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात सुनावणी सुरु आहे. आता उद्या 11 वाजता सुनावणीला सुरुवात होईल. दरम्यान आजच्या सुनावणीत काय झालं हे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं.

संजय शिरसाट म्हणाले, आज सुनील प्रभू यांची वकील महेश जेठमलानी यांनी उलट तपासणी केली. जेठमलानी यांनी प्रभूंना अनेक प्रश्न विचारेल. जो २० तारखेला तुम्ही व्हीप दिला त्यावर तुमची सही आहे का? असा प्रश्न विचारला असता प्रभूंनी ते मान्य केलं. सुनील प्रभू यांनी स्पष्ट उत्तरे दिली नाहीत. व्हीप किती लोकांना बजावला याचे उत्तर देखील सुनिल प्रभू यांनी दिले नाही.

सुनील प्रभूंची उत्तर समाधानकारक नव्हती. २० आणि २१ च्या व्हिपवरील सही तुमचीच आहे का, असा प्रश्न सुनील प्रभू यांना विचारण्यात आला असता त्यावेळी मी ताणावात होतो. त्यामुळे जे कार्यालयीन कामकाज झाले. त्याबाबत मला जास्त सांगता येणार नाही, असे उत्तर प्रभू यांनी दिले, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली. 

MLA Disqualification Case
Loksabha Election 2024: "जिथं मित्रपक्ष लढतील तिथं...";  लोकसभा निवडणुकीसाठी फडणवीसांनी सांगितला भाजपचा मास्टर प्लॅन

मुळात ज्या व्हिपबद्दल बोलले जात होते, तो का काढला कुणी काढला यावर सर्व सुनावणी अवलंबून होती. सुनील प्रभूंनी उत्तरात जे दिलं ते रेकॉर्ड करण्यात आलं असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

MLA Disqualification Case
Bacchu Kadu: "मला मुख्यमंत्री बनवलं तर..."; बच्चू कडू कडाडले, बागेश्वर बाबावरून फडणविसांना दिले टोले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com