उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना प्रायव्हेट लिमिटेड करू नये; रवी राणांचा अस्तित्वावर घाव

'संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत म्हणजे, फिक्सिंग मॅच आहे.'
Uddhav Thackeray vs Ravi Rana
Uddhav Thackeray vs Ravi Ranaesakal
Summary

'संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत म्हणजे, फिक्सिंग मॅच आहे.'

अमरावती : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेनेत (Shiv Sena) उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. या बंडानंतर मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर भाजपशी हातमिळवणी करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.

इतकंच नाही, तर आता शिवसेना खरी कोणाची?, धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार?, याचा फैसलाही निवडणूक आयोगापुढं होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतलेली मुलाखत आज 26 आणि 27 जुलै रोजी प्रसिद्ध होत आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी या मुलाखतीवर जोरदार टीका केलीय. ते माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

Uddhav Thackeray vs Ravi Rana
छत्रपतींच्या बाबतीतही विश्वासघातकाचं राजकारण, पाठीत खंजिर खुपसणाऱ्यांना जनता माफ करणार नाही : राऊत

सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची घेतलेली मुलाखत म्हणजे फिक्सिंग मॅच असल्याचं त्यांनी म्हटलंय. राणा पुढं म्हणाले, मुलाखतीत संजय राऊत यांचेच प्रश्न असून उद्धव ठाकरेंनी उत्तर काय द्यायचं हे ही राऊतांनीच आधीच ठरवलेलं आहे. उद्धव ठाकरे हे संजय राऊतांची कटपुतली झाले आहेत. परंतु, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांना प्रायव्हेट लिमिटेड करु नये. कारण, शिंदे गटाचीच खरी शिवसेना आहे, अशी टीका त्यांनी राऊतांसह उद्धव ठाकरेंवर केलीय. उद्धव ठाकरेंचं उरलेलं अस्तित्वही संपवण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली असल्याचा आरोपही रवी राणांनी केलाय.

Uddhav Thackeray vs Ravi Rana
आमच्या नादाला लागलात, तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करु; शिवसेना आमदाराचा राष्ट्रवादीला थेट इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com