
Sandip Deshpande: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातील आपल्या अनुभवांवर लिहिलेलं आणि नुकतंच प्रकाशित झालेलं 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाची खुद्द शिवसेनेच्या विरोधकांनाही भूरळ पडली आहे. नुकतेच हे पुस्तक मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी वाचलं आणि नुसतं वाचलंच नाही तर ते सोशल मीडियावर शेअर करत आपला चांगला अभिप्रायही दिला आहे. त्यामुळं आता राज्याच्या राजकारणात नवे वारे वाहत असल्याच्या चर्चांना पुष्टी मिळाली आहे. विशेष म्हणजे संदीप देशपांडे यांच्या या पोस्टवर संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.