
Raj Thackeray : राज्याचं राजकारण गेल्या काही काळापासून प्रचंड अस्थिर झालं आहे. यापार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात पुन्हा बदलाची हवा वाहू लागली आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीचे संकेत दिले आहेत. निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'वास्तव मे ट्रुथ' या पॉडकास्टमध्ये याबाबतच विधान केलं आहे. आपली सविस्तर भूमिका मांडताना आम्हा दोघांमधील वाद किरकोळ आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.