
राज्यसभेसाठीच्या जागेसाठी एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन CM कुठे
'संभाजीनगरमध्ये आज CM ठाकरे तोफ धडाडणार, लवंगी वाजली तरी पुरे'
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील वातावरण तापलं आहे. नेत्यांच्या गाठीभेटी आणि सभा दौरे यामुळे हे वातावरण आणखी तापण्याची शक्यताही आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं या सभेकडे लक्ष लागले आहे. सभेसाठी जोरदार तयार सुरु केली असून विरोधक मात्र शिवसेनेला डिवचण्याच्या भूमिकेत आहेत. (MNS Latest Political News)
औरंगाबाद येथील संदर्भात मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंवर आणि ठाकरे सरकारावर सडकून टीका केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, तत्वांसाठी सत्तेवर लाथ मारणारे माननीय बाळासाहेब ठाकरे कुठे आणि एका राज्यसभेसाठीच्या जागेसाठी एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठे, असो आज संभाजीनगरमध्ये तोफ धडाडणार असं म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे, म्हणत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना डिवचंल आहे.
हेही वाचा: 'मविआवर नाराज असलेल्या 5 आमदारांनी भाजपसोबत यायला हरकत नाही'
दरम्यान, औरंगाबाद येथील सभेच्या ठिकाणी व्यासपीठाच्या एका बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे औरंगाबादच्या नामांतराच्याच पार्श्वभूमीवर ही तयारी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आजच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणती वक्तव्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आता मनसेच्या टीकेवर शिवसेना काय प्रत्त्युर देणार हेही पहावे लागणार आहे.
हेही वाचा: रणनीती ठरलीये, राज्यसभेचा गुलाल महाडिकच उधळणार, गिरीश महाजनांचा दावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) ही सभा शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणार आहे. काही दिवसांपूर्वी याच मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही सभा झाली होती. त्या सभेप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठीही पोलिसांनी १५ अटी-शर्ती घातल्या आहेत. या सभेदरम्यान त्यांचं पालन करावं लागणार आहे. तसंच या सभेसाठी पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
Web Title: Mns Sandeep Deshpande Criticized Uddhav Thackeray Aurangabad Today Meeting Of Shivsena
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..