MNS : शिवसैनिकांमार्फत राज ठाकरेंचा घातपात करण्याचा होता कट; मनसे नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

Uddhav Thackeray and Raj Thackeray
Uddhav Thackeray and Raj Thackeray

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आपल्या सडेतोड भूमिकेसाठी सर्वांना परिचीत आहे. सध्या राज ठाकरे भाजपच्या निकट गेले असून ते सातत्याने उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल करत आहेत. त्यातच आज मनसेच्या नेत्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Uddhav Thackeray and Raj Thackeray
Ahmednagar : गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, 2005 मध्ये नारायण राणे यांच्या बंडानंतर शिवसैनिकांची मालवनमध्ये जाण्याची हिंमत नव्हती. त्यावेळी राज ठाकरे मालवनमध्ये गेले होते. त्यावेळी राज ठाकरे यांचा घातपात करण्यासाठी शिवसैनिकांमार्फत कट रचून मुंबईतील गुंडांना सुपारी दिली गेली होती. मालवणमध्येच घातपात झाल्यानंतर नाव नारायण राणे यांच्यावर येईल, अस नियोजन करण्यात आलं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट देशपांडे यांनी केला.

Uddhav Thackeray and Raj Thackeray
Kasba Bypoll :...ती आमची संस्कृतीच नाही; पैसे वाटण्याच्या आरोपांवर गृहमंत्री फडणवीसांचं विधान

संदीप देशपांडे यांचा संपूर्ण रोख उद्धव ठाकरे यांच्याकडेच दिसून येत आहे. याला ठाकरे गटाकडून अद्याप प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही. एकंदरीतच देशपांडे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकारण तापणार हे निश्चित आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यातच आज देशपांडे यांनी मोठा दावा केला. त्यामुळे आता आगामी काळात मनसे आणि उद्धव ठाकरे गटात संघर्ष होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com