राज ठाकरेंच्या भेटीसाठी मनसेचे वसंत मोरे मुंबईला रवाना

मुंबईत मनसेच्या नवनिर्वाचित प्रवक्त्यांची शिवतीर्थावर बैठक बोलवली आहे.
Vasant More Visit to Raj Thackeray
Vasant More Visit to Raj Thackerayesakal
Summary

मुंबईत मनसेच्या नवनिर्वाचित प्रवक्त्यांची शिवतीर्थावर बैठक सुरु आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मनसेत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भूमिकेवर उघड उघड नाराजी व्यक्त केल्याने त्यांना शहराध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आलं आहे. यादरम्यान, मोरेंना अनेक मोठ्या पक्षांकडून ऑफर येण्यास सुरुवात झाली मात्र वसंत मोरे यांनी राज ठाकरेंना भेटल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी मोरेंना आज भेटीसाठी मुंबईला बोलावले आहे. त्यामुळे वसंत मोरे हे आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. (Vasant More Visit to Raj Thackeray)

Vasant More Visit to Raj Thackeray
मनसे मुंबईसाठी खंबीर, राऊतांनी फक्त..; संदीप देशपांडेंची टीका

मनसेचे नेते वसंत मोरे यांना अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेटीसाठी वेळ दिली आहे. आज सकाळी 11 वाजता वसंत मोरे हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यासाठी मोरे पुण्याहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांच्या मुबंईतील शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होणार आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वसंत मोरे नाराज आहेत. पुण्यातील मनसेचा कुठलाही पदाधिकारी भेटीवेळी सोबत असणार नाही. वसंत मोरे एकटेच मुबंईमध्ये राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून अजूनही आपल्या भूमिकेवर वसंत मोरे ठाम असून त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मनसेच वसंत मोरे यांच्याकडील असलेलं पुणे शहराध्यक्ष पद काढून साईनाथ बाबर यांना मनसेने शहराध्यक्ष पद दिलं आहे.

या सर्व घडामोडी नंतर वसंत मोरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या काही नेत्यांनी फोन केला. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपर्क साधल्याच मोरे सांगत आहेत. मात्र आपण मनसेतच राहणार आपण मनसैनिक आहोत असं मोरे यांनी स्पष्ट केलंय. आता या सगळ्या घडामोडीनंतर वसंत मोरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर काय निर्णय घेतात, या दोघांमध्ये काय चर्चा होणार याकडं राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Vasant More Visit to Raj Thackeray
पुढील काही तास राज्यातील 'या' भागांत गारपीटासह जोरदार पाऊस

मनसे प्रवक्त्यांची शिवतीर्थावर महत्वाची बैठक

या घडामोडींमध्ये आता मनसेतून आणखी एक बातमी समोर येत आहे. मुंबईत आज राज ठाकरे यांनी प्रवक्त्यांची महत्वाची बैठक शिवतीर्थावर बोलवली आहे. दरम्यान, मुंबईत मनसेच्या नवनिर्वाचित प्रवक्त्यांची शिवतीर्थावर बैठक सुरु आहे. ठाण्यातील सभेआधी मनसेप्रमुख प्रवक्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाची पुढील भूमिका आणि धोराणांवर मार्गदर्शन करणार असल्याचे माहिती मिळत आहे. त्यामुळे ही महत्वाची बैठक आज राज ठाकरे यांनी बोलावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com