पुढील 48 तासांत महाराष्ट्रात पावसाचा इशारा, हवामान खात्याची माहिती

मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही - IMD
Rain update in maharashtra
Rain update in maharashtrasakal
Summary

मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही - IMD

मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पावसाच्या सरी सुरु आहेत. कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. यावर्षी मृग नक्षत्र कोराडाच गेला असल्याने शेतकरी चिंतेत आहे. २६ जूनपासून पावसाला सुरुवात होईल अशी माहिती मिळत होती. त्याप्रमाणे काही ठिकाणी पावसाने सुरुवात केली. दरम्यान, आता हवामान खात्याने एक ट्वीट करत पुढील ४८ तासांत राज्यात पावसाचा इशार दिला आहे.

यंदा मान्सून लवकर दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, आता हवामान खात्यानं आणखी एक ट्वीट करत पाऊस पडणार असल्याची माहिती दिली आहे. भारतीय हवामान खात्यानं यासंदर्भात कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अर्लट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकणासह महाराष्ट्रातील काही भागात सरी बरसण्याची शक्यता आहे.

Rain update in maharashtra
उद्या बहुमत चाचणी होणार का? सेनेच्या आव्हानावर सुप्रिम कोर्टात तात्काळ सुनावणी
Rain update in maharashtra
किशोरी पेडणेकरांना अश्लील भाषेत धमकी; बंद लिफाफ्यातून पत्र

दरम्यान, जून महिन्यातील पावसाचा संभाव्य अंदाजही वर्तवण्यात आला आहे. यामध्ये सामान्य किंवा सामान्य पाऊस भारताच्या वायव्य आणि मध्य भारतात पडेल तसेच असाच पाऊस उत्तर द्वीपकल्प, पूर्वेचा काही भाग आणि ईशान्येकडील काही भागांमध्येही होण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भारत आणि ईशान्य भारत तसेच वायव्य, पूर्व आणि मध्य भारताच्या काही भागात सामान्य किंवा त्यापेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाजही हवामान खात्यांन वर्तवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com