esakal | चिंताजनक! राज्यात मे महिन्यात ३४ हजारांपेक्षा अधिक बालकांना कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

child corona

चिंताजनक! राज्यात मे महिन्यात ३४ हजारांपेक्षा अधिक बालकांना कोरोनाची लागण

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जास्तीत जास्त ज्येष्ठ प्रभावित झाले होते. मात्र, दुसऱ्या लाटेत तरुणांना मोठ्या प्रमाणात ससंर्ग झाला आहे. तिसरी लाटही येऊ घातली आहे. या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे बोलले जात आहे. मात्र, दुसऱ्या लाटेतच फक्त मे महिन्यात १० वर्षांच्या खालील ३४ हजार ४८६ बालकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

हेही वाचा: आता घड्याळाद्वारेही शिंपडता येणार सॅनिटायजर, तरुणानं तयार केलीय 'रोल ऑन वॉच'

मे महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाचा संसर्ग झालेल्या बालकांची संख्या १ लाख ३८ हजार ७७६ होती. मात्र, ती २६ मे रोजी १ लाख ७३ हजार ०६० वर पोहोचली आहे. तसेच १ मे रोजी ११ ते २० वर्ष वयोगटातील ३ लाख ११ हजार ४५५ रुग्ण होते, तीच संख्या आता ३ लाख ९८ हजार २६६ वर पोहोचली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका हा लहान मुलांना असल्याचं बोलले जात आहे. मात्र, याबाबत अद्यापही कुठलाही शास्त्रीय पुरावा नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे पालकांना तितकी चिंता करण्याची गरज नाही. पण, लहान मुलांची काळजी मात्र घेणं गरजेचं आहे.

पहिल्या लाटेतही बालकांना झाला होता कोरोनाचा संसर्ग -

कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. वरिष्ठ आणि तरुणांच्या तुलनेत लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असते. जन्मानंतर लहान मुलांना लसीकरण केले जाते. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढत असते. त्यामुळेच पहिल्या लाटेमध्ये लहान मुलांना कमी फटका बसला. आता देखील पालकांनी चिंता करू नये. फक्त आवश्यक ती काळजी घ्यावी. मुलांना घराबाहेर पडू देऊ नका आणि त्यांच्या आहारावर लक्ष केंद्रीत करा, असे तज्ज्ञांनी सांगितले.