राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मिळणार ‘मॅप्स’अंतर्गत ५ हजार रुपये भत्ता

 youth
youth

- संदीप लांडगे

छत्रपती संभाजीनगर : औद्योगिक अस्थापनांमध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा वापर करून कुशल कारागिरास आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यासाठी शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना (अप्रेंटीसशीप) केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली राज्यभर राबविण्यात येते. या शिकाऊ उमेदवारांना मॅप्स अंतर्गत दरमहा पाच हजार रुपये भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

 youth
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीनशे शाळांवर गंडांतर; गरीबांची मुले शिकतील कसे? नागरिकांचा सवाल

या योजनेचा राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फायदा झाला असून, यासाठी अंदाजे ७५ कोटीपेक्षा जास्त रुपये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाकडून वितरित करण्यात आले आहेत.

राज्यातील बेरोजगार उमेदवारांच्या संख्येचा विचार करता, राज्यातील शिकाऊ उमेदवारी योजनेची व्याप्ती वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून नवनवीन योजना आखल्या जात आहेत. पूर्वी केंद्र शासनाकडून नॅशनल अप्रेंटीसशिप प्रमोशनल स्कीम (नॅप्स) अंतर्गत संबंधित अस्थापनेला अप्रेंडीसशिप करणाऱ्या प्रति उमेदवारासाठी प्रतिमहा दीड हजार रुपये देण्यात येत होते.

 youth
Maharashtra Politics: सामनाच्या अग्रलेखावर मविआच्या टिकेनंतर ठाकरे गटाच्या नेत्याचं स्पष्टीकरण म्हणाले, 'अग्रलेख राष्ट्रवादीवर...'

हा भत्ता संबंधित अस्थापनाकडे केंद्र शासनाकडून वर्ग केला जात होता. परंतु, आता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या पुढाकाराने राज्यात शासकीय, निमशासकीय आणि खासगी अस्थापनामध्ये शिकाऊ उमेदवाराच्या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (मॅप्स) सुरु करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शिकाऊ उमेदवारांना प्रोत्साहन योजनेअंतर्गत देय विद्यावेतनाच्या ७५ टक्के किंवा जास्तीतजास्त ५ हजार रुपये यापैकी कमी असलेले विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फायदा राज्यातील जवळपास एक लाखांपेक्षा जास्त शिकाऊ उमेदवारांना झाला आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून ७५ कोटींपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे.

 youth
Ajit Pawar: "प्रकल्प आणण्याची धमक सरकारमध्ये नाही"; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

"छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याअंतर्गत १३ अस्थापनामधील सुमारे ३ हजार ८७७ शिकाऊ उमेदवारांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास व रोजगार, उद्योजकता विभागामार्फत सुमारे २.३० कोटी रुपये वितरण करण्यात आले आहेत. या योजनेमुळे शिकाऊ उमेदवारांना मोठा फायदा होत आहे."

- अभिजित अल्टे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com