Mumbai Additional Police Commissioner Manoj Kumar Sharma speaks with protesters
Mumbai Additional Police Commissioner Manoj Kumar Sharma speaks with protesters

'रक्ताला कुठलाच रंग नसतो'; पोलिस अधिकारी जमावाला म्हणताच टाळ्यांचा कडकडाट

मुंबई : मुंबईत आंदोलन करण्यासाठी एकत्र जमलेल्या सर्व नागरिकांना आमच्या सर्व पोलिस बांधवांचे सहकार्य असेल. तुम्ही सर्व आंदोलनकर्ते एकत्र या, पण एक गोष्ट दाखवून द्या की मुंबईच्या सगळ्या नागरिकांच्या रक्ताचा कुठलाच रंग नसतो. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात कुठलच अंतर नाही, असे जमलेल्या समुदायासमोर मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज कुमार शर्मा यांनी म्हणताच जमावाकडून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करण्यात आले. 

देशात CAA आणि NRC या दोन नागरिकत्व विधायकांना घेऊन सुरू असलेल्या अनेक अंदोलनामध्ये मोठ्याप्रमाणात जाळपोळ करण्यात आली, मात्र या सगळ्या घटनेला मुंबई शहर अपवाद ठरलं. मुंबई शहरातील आगस्ट क्रांती मैदानामध्ये हजारोंच्या संख्येने अनेक नागरिक आंदोलन करण्यासाठी आले होते, मात्र ते संपूर्ण आंदोलन शांततेत पार पाडण्यात आले, त्याचं एकच कारण होतं, की मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज कुमार शर्मा. 

मनोज कुमार शर्मा यांनी आंदोलनासाठी आलेल्या अनेक नागरिकांना आवाहन करत मुंबईत कोणत्याच धर्माला स्थान नाही. आंदोलन शांततेत केल्यास आमचीही तुम्हाला मदत असेल, असे मत व्यक्त केले.

जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट एकदम शांततापूर्व सांगत असता, तोपर्यंत आम्ही तुमचे भाऊ आहोत, पण ज्यावेळी तुम्ही एखादा कायदा तुमच्या हातात घेता, त्यावेळी आमच्यासमोर नाईलाज असतो, त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की कुठलीही अपात्कालिन परिस्थिती आणण्याचा प्रयत्न करु नका, असे आवाहन शर्मा यांनी आंदोलनकर्त्यांना केलं होते, त्यामुळे मुंबईत कोणत्याही प्रकारची जाळपोळ किंवा दंगा झाला नसल्याचे चित्र समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com